ETV Bharat / state

पोटाची खळगी भरण्यासाठी महिलांचा ५०० किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास - भाजी विक्रीसाठी रेल्वेप्रवास

महिलांना गावातच रोजगार मिळवून देण्याच्या घोषणा मोदी सरकारकडून करण्यात आल्या. प्रत्यक्षात मात्र, लॉकडाऊननंतर महिलांना तुटपुजे पैसे कमविण्यासाठी ५०० किमी प्रवास करून भाजी विक्री करत उदरनिर्वाह करण्याची वेळ आल्याचे वास्तव चित्र ईटीव्ही भारतने समोर आणले आहे.

महिलांचा ५०० किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास

author img

By

Published : Jan 20, 2021, 7:06 AM IST

Updated : Jan 20, 2021, 12:38 PM IST

ठाणे - लॉकडाऊनमुळे देशभरातील गरिबांचे जगणे मुश्किल होऊन बसले होते. त्यांनतर मायबाप सरकारने पाच महिन्यानंतर लॉकडाऊनच्या समाप्तीची घोषणा करून अनलॉक घोषित केला. मात्र अनलॉकमध्येही गरिब मजुरांच्या हाताला अद्यापही गावाकडे काम मिळेना. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी शेकडो महिलांचा प्रवास थक्क करणारा असल्याची विदारकता समोर आली आहे.

विशेष म्हणजे या महिला मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथून रेल्वेने १२ तासाचा ५०० किलोमीटरचा प्रवास करून कल्याणला येतात. या रेल्वे स्थानकात उतरून स्थानकाच्या समोरच फुटपाथवर हिरव्या भाजीपाल्याची विक्री करतात. यातून मिळालेली तुंटपुजी रक्कम घेऊन पुन्हा त्या परतीच्या दिशेचा प्रवास करतात. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या काळात आजही महिलांना कुटूंबाच्या उदरर्निवाहसाठी शेकडो किलोमीटर प्रवास करावा लागत असल्याचे चित्र 'ई टीव्ही भारत'ने समोर आणले आहे.

महिलांचा ५०० किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास
सुरक्षित राहून प्रवासात मिळेल तेवढीच झोप ..

मध्यप्रदेश राज्यातील बऱ्हाणपूर शहर महाराष्ट्राच्या सीमेवरच आहे. या शहरातून शेकडो महिला दिवसभर शेतात भाजीपाला गोळा करून सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घरातून निघून मध्यरेल्वेच्या भुसावळ जक्शन येथून मुंबईकडे येणाऱ्या मेल, एक्स्प्रेसमधून भाजीपाल्याचे गाठोडे घेऊन प्रवास करतात. या दरम्यान एकमेकींच्या गाठोड्याकडे लक्ष ठेवून प्रवासात मिळेल तेवढीच झोप काढतात. त्यांनतर पहाटे ४ वाजता भाजीपाल्याची गाठोडे कल्याण रेल्वे स्थानकात उतरून स्थानकासमोरच फुटपाथवर या महिला भाजीपाला विक्री सुरु करतात. पहाटेपासून सकाळी ९ वाजेपर्यंत ग्राहक मागेल त्या दरात भाजी विक्री करतात आणि पुन्हा सर्वंजणी एकत्र होऊन कल्याण रेल्वे स्थानकातून परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात. सायंकाळी ६ वाजेपर्यंत त्या त्यांच्या घरी पोहोचत असल्याची माहिती भाजी विक्रेत्या आशाबाई यांनी 'ई टीव्ही भारत'शी बोलताना दिली.

सरकारच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखा !

या महिलांचा हा २४ तासांचा पोटाची खळगी भरण्यासाठी केलेला प्रवास बऱ्याच अंशी महिलांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याची घोषणा करणाऱ्या सरकारच्या डोळयात जळजळीत अंजन घालण्यासारखा आहे. त्याचे विदारक चित्रच'ई टीव्ही भारत'ने समोर आणले आहे.

Last Updated : Jan 20, 2021, 12:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.