ठाणे - बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याचे समजताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या महिलेने धमकावल्याचा दावा त्यांनी केला आहे. साईनाथ तारे असे बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याचे नाव आहे. मात्र, या गुन्ह्याबाबत पोलीस उपआयुक्त यांच्याकडे विचारांना केली असता त्यांनी अधिक न बोलता चुप्पी साधली आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
हेही वाचा - धक्कादायक..! शिवसेना पदाधिकाऱ्याचा विवाहितेवर कारमध्ये बलात्कार
पीडित विवाहितेला दोन वर्षांपूर्वी आरोपी साईनाथने व्यवसायात भागीदार राहण्यासाठी कल्याण पूर्वेतील मॉलमध्ये बोलावले होते. मात्र, त्यावेळी पीडितेने भागीदारी व्यवसायास नकार दिल्याने आरोपीने पीडितेवर अश्लील शेरेबाजी केली. त्यांनतर पीडितेच्या फेसबुक व व्हॉट्सअपवर आरोपीने अश्लील फोटो व मॅसेज पाठवून व्हायरल करण्याची धमकी दिली. धमकीला घाबरून पीडिता आरोपीसोबत त्याच्या कारमध्ये गेली असता, त्याने पुन्हा पीडितेसोबत अश्लील कृत्य करून व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत, कार पत्रीपूल नजीकच्या निर्जनस्थळी नेवून तिच्यावर कारमध्ये बलात्कार केला.
या गुन्ह्याचा घटनाक्रम पाहता आरोपीच्या धमकीने पीडिता भयभीत झाली होती. मात्र, अखेर तिने धाडस करून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिच्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. पोलिसांनी आरोपी साईनाथ कलम 376, 354, 354 (ड), 323, 506, आयटी कलम 67 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसरीकडे बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर साईनाथ तारे यांनी समाजमाध्यमांवर त्या पीडित महिलेचे आरोप फेटाळून लावत मला या गुन्ह्यात नाहक अडकवल्याचे सांगत त्यांच्यासोबत घडलेल्या प्रसंग त्यांनी सांगितला. मात्र, या गुन्ह्याबाबत पोलीस उपआयुक्त विवेक पानसरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अधिक न बोलता चुप्पी साधल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसून आले.
हेही वाचा - ठाण्यात अपहरण करून लुबाडणाऱ्या आरोपींना अटक