ETV Bharat / state

पत्नीचा मृत्यू जादूटोण्यामुळे झाल्याच्या संशयातून मामीची हत्या करणारा भाचा गजाआड - जादूटोण्याच्या संशयातून हत्या

आरोपी मोहन याच्या पत्नीचा 8 दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. मामी गुलाबबाई हिनेच काहीतरी जादूटोणा केला असावा म्हणूनच आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोपी मोहन याचा समज झाला होता.

thane crime news
ठाणे क्राईम बातमी
author img

By

Published : Jul 30, 2020, 5:18 AM IST

ठाणे - भूत संचारल्याच्या संशयातून माय-लेकाची 4 जणांनी मिळून हत्या केल्याची घटना आंबिवली स्टेशननजीक असलेल्या अटाळी गावात शनिवारी 25 जुलैच्या रात्री घडली होती. या घटनेची पुनरावृत्ती टिटवाळामध्ये घडली आहे. काहीतरी जादूटोणा केल्यामुळेच पत्नीचा मृत्यू झाल्याच्या संशयातून भाच्याने मामीचा खून केल्याची घटना समोर आली आहे.

गुलाबबाई मारवत वाघे (45) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी गुलाबबाईचा मुलगा गणपत वाघे (21) याच्या जबानीवरून कल्याण तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर, गुलाबबाईचा खून करून पसार झालेला मोहन चंदर वाघे (28) याला कल्याण तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पत्नीचा मृत्यू जादूटोण्यामुळे झाल्याच्या संशयातून मामीची हत्या करणारा भाचा गजाआड

हेही वाचा -कांगारु, माकडे, कासव अन् पोपटांची तस्करांच्या तावडीतून सुटका; परदेशातून भारतात तस्करी

आरोपी मोहन याच्या पत्नीचा 8 दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. मामी गुलाबबाई हिनेच काहीतरी जादूटोणा केला असावा म्हणूनच आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोपी मोहन याचा समज झाला होता. त्यामुळे बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास गुलाबबाई या त्यांच्या घरासमोरील अंगणात बसलेल्या असताना आरोपी मोहन तिथे आला. तूच काहीतरी केलेस म्हणून माझी बायको मेली, असा आरोप करत मोहन हा मामी गुलाबबाई हिच्याशी भांडू लागला. मामी-भाच्यात कडाक्याचे भांडण जुंपले. इतक्यात मोहन याने घरातून आणलेल्या लोखंडी सुऱ्याने भोसकून मामीला ठार मारले आणि तो तेथून पसार झाला.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर गुलाबबाईचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता शासकीय रुग्णालयात पाठवला. पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फरार आरोपी मोहन वाघे याला अवघ्या साडेपाच तासात गजाआड केले. त्याच्याकडून रक्ताने माखलेला सूरा देखील हस्तगत करण्यात आला. बुधवारी कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने मोहन वाघे याला अधिक चौकशीसाठी 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष दराडे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.