ETV Bharat / state

Asangaon Railway Station : मालगाडी खाली आल्याने महिला प्रवाशाचे हात पाय धडावेगळे - विद्या वाखारीकर

आसनगाव रेल्वे स्थानकावर मालगाडी खाली आल्याने महिला प्रवाशी गंभीर जखमी झाली आहे. मालगाडी महिलेच्या हाता पायावरुन गेल्याने हात पाय धडावेगळे झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी महिलेला तातडीने सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्या वाखारीकर ( वय ५३, रा. आसनगाव ) असे अपघातात हात, पाय गमावून बसलेल्या नर्सचे नाव आहे.

Asangaon Railway Station
Asangaon Railway Station
author img

By

Published : Jul 22, 2023, 11:21 PM IST

Updated : Jul 23, 2023, 10:41 PM IST

ठाणे : आसनगाव रेल्वे स्थानकात शनिवारी पहाटेची लोकल पकडताना एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली आहे. लोकल लवकर पकडण्याच्या नादात महिला प्रवाशी रुळावर उभ्या असलेल्या मालगाडी खालून जात होती. त्याचवेळी मालगाडी सुरू झाली. मालगाडी महिलेच्या हात, पायावरुन गेल्याने महिलेच्या हात, एक पाय शरिरापासून वेगळा झाल्याची घटना घडली आहे. या महिलेला तातडीने मुंबईत सायन येथील रुग्णालयात दाखल करुन तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. ही घटना मध्यरेल्वेच्या आसनगाव रेल्वे स्थानकात घडली आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. विद्या वाखारीकर ( वय ५३, रा. आसनगाव ) असे अपघातात हात, पाय गमावून बसलेल्या नर्सचे नाव आहे.

नोकरी निमित्त लोकलने प्रवास : मिळालेल्या माहितीनुसार विद्या वाखारीकर या शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे कुटूंबासह राहतात. त्या मुंबईतील सायन भागात असलेल्या लोकमान्य टिळक रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत आहेत. नेहमी प्रमाणे त्या नोकरी निमित्त आसनगाव ते सायन रेल्वे स्थानकापर्यत लोकलने प्रवास करतात. (आज ) शनिवारीही रुग्णालयात सकाळची ड्युटी असल्याने त्या कसाऱ्याहून आसनगाव रेल्वे स्थानकात पहाटे ४. वाजून २८ मिनिटांनी येणाऱ्या कसारा लोकलने मुंबईत जात होत्या.

हाता पायावरुन गेली मालगाडी : आसनगाव रेल्वे स्थानकाच्या फलाटावर जाण्यासाठी पूर्वेला पादचारी पूल आहे. स्टेशनवर जाण्यासाठी वळसा न घेता, रुळावर उभ्या असलेल्या मालगाडी खालून पटकन फलाटावर उतरता यावे म्हणून वाखरीकर मालगाडी खाली घुसल्या. त्याच वेळी मालगाडी सुरू झाली. मालगाडी त्यांच्या डाव्या हातावरुन तसेच डाव्यापायावरुन गेल्याने हात तसेच पाय धडावेगळे झाले. हे पाहून मुलाने इतर प्रवाशांच्या मदतीने आरडाओरडा केली. गंभीर जखमी झालेल्या वाखरीकर यांना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात, नंतर सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. शिवाय, त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत, असे कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वरिष्ठ सल्लागार अनिता झोपे यांनी सांगितले.

Last Updated : Jul 23, 2023, 10:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.