ETV Bharat / state

कल्याणमध्ये महिलेची भर दिवसा दगडाने ठेचून हत्या - खडकपाडा पोलीस

कल्याण पश्चिमेतील हाय प्रोफाइल गांधारी ते टिटवाळा असे रिंगरोड रस्त्याचे काम सुरु आहे. याच रस्त्यावर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एका महिलेचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. याची माहिती कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना मिळताच खडकपाडा पोलिसांनी पथकासह घटनास्थळी दाखल होवून पंचनामा करत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात रवाना केला.

दगडाने ठेचून हत्या
दगडाने ठेचून हत्या
author img

By

Published : Sep 6, 2021, 9:02 PM IST

ठाणे - एका विवाहितेची भर दिवसा रस्त्यावरच दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पश्चिम परिसरातील हाय प्रोफाइल वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गांधारी भागातील रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र महिलेचा भर दिवसा झालेल्या हत्येने परिसरात खळबळ उडाली असून हत्येचा संशय विवाहितेच्या पतीवर असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. लक्ष्मी मोहिते (वय २५ रा. सावदगाव, भिवंडी ) असे हत्या झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

कल्याणमध्ये महिलेची भर दिवसा दगडाने ठेचून हत्या

मृतक घरकाम करणारी होती

कल्याण पश्चिमेतील हाय प्रोफाइल गांधारी ते टिटवाळा असे रिंगरोड रस्त्याचे काम सुरु आहे. याच रस्त्यावर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एका महिलेचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. याची माहिती कल्याणच्या खडकपाडा पोलिसांना मिळताच खडकपाडा पोलिसांनी पथकासह घटनास्थळी दाखल होवून पंचनामा करत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात रवाना केला. मृतक लक्ष्मी ही गांधारी परिसरात घरकाम करणारी होती.

हत्येचे कारण गुलदस्तात

लक्ष्मीची हत्या तिचा पती जर्नादन मोहिते याने केली असल्याचा संशय पोलिसांना असून हत्येनंतर तो बेपत्ता झाला आहे. लक्ष्मीची हत्या दगडाने ठेचून का करण्यात आली? याचे कारण अद्यापही पोलिसांना समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस करत आहे.

हेही वाचा - खळबळ! करुणा मुंडेंच्या गाडीत आढळले पिस्तूल, धनंजय मुंडेंच्या घातपाताची शक्यता?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.