ठाणे Woman Lawyer Beaten : भिवंडी न्यायालयासमोर दोन गटात वाद झाल्याची घटना ताजी असतानाच न्यायालयाच्या मुख्य गेटबाहेर एक खळबळजनक घटना घडली आहे. 33 वर्षीय महिला वकिलाच्या कानशिलात लगावून वकिलानं विनयभंग केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तसंच विनयभंग करणाऱ्या वकिलाच्या साथीदारानं महिला वकिलाच्या सहकाऱ्याला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पीडित महिला वकिलाच्या फिर्यादीवरून विनयभंग, मारहाण करणाऱ्या वकिलाविरुद्ध शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शैलेश मधुकर गायकवाड असं वकिलाचं नाव असून त्यांच्या साथीदारचं आलम शेख असं नाव आहे.
वकीलाच्या कानशिलात लगावली : पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मदनपुरा भागात राहणारी 33 वर्षीय महिला वकील कामानिमित्त भिवंडी दिवाणी न्यायालयात आली होती. त्यावेळी ती 5 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास न्यायालयाच्या मुख्य गेटसमोर मोबाईलवर ती बहिणीशी बोलत होती. त्यावेळी आरोपी वकील अचानक त्या ठिकाणी आला. त्यानं पीडित महिला वकिलाला शिवीगाळ केली. त्यानंतर पीडित महिला वकिलानं आरोपी वकील शैलेश मधुकर गायकवाडला विचारणा केली असता, त्यानं तिच्या कानशिलात लगावली.
अमरेशला बेदम मारहाण : हा प्रकार पाहून आरोपी वकील शैलेशचा साथीदार आलम हा पीडित महिला वकिलाला मारण्यासाठी पुढे आला. त्यास विरोध करण्यासाठी पीडित महिला वकिलेचा सहकारी अमरेश (बंटी)नं त्याला विरोध केला. मात्र, त्यावेळी वकील शैलेशनं त्याच्या छातीवर लाथ मारली. तसेच आलमनं उमरेशला पकडून ठेवलं होतं. त्यावेळी वकील शैलेशनं त्याला बेदम मारहाण केली आहे. दुसरीकडे या घटनेनंतर भिवंडी न्यायालयात असलेल्या वकील मंडळीमध्ये एकच खळबळ उडाली होती.
गुन्हा दाखल : या घटनेमुळे पीडित महिलेच्या वकिलानं घाबरून 6 सप्टेंबर रोजी शांतीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला. वकील शैलेश गायकवाड त्याचा साथीदार आलम यांच्या विरोधात पोलिसांनी भादंवि कलम 509, 323, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष करीत आहेत.
हेही वाचा -