ETV Bharat / state

Woman Kidnapping Case: तीन लाखांसाठी मैत्रिणीचे अपहरण; अपहरकर्त्या मैत्रिणीसह ७ जणांच्या टोळीचा शोध सुरू - Woman Kidnapping Case

Woman Kidnapping Case: पैशाच्या वादातून दोन जिवलग मैत्रिणींमध्ये वाद (dispute between two friends over money) निर्माण झाला. (friend kidnapped lady friend) यातून एका मैत्रिणीचे तिच्या 7 साथीदारांच्या मदतीने स्वत:च्याच मैत्रिणीचे अपहरण केले. (Kidnapping of woman for ransom) ही घटना ठाणे जिल्ह्यातील शांतीनगर पोलीस ठाण्या अंतर्गत घडली आहे. सोनाली अजय जाधव (वय ३०) असे अपहरण झालेल्या महिलेचे नाव आहे. तर कविता सिंह असे मुख्य आरोपी महिलेचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी कवितासह तिच्या 7 साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. (kidnapping by conspiracy)

Woman Kidnapping Case
७ जणांच्या टोळीचा शोध सुरू
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 9:12 PM IST

ठाणे Woman Kidnapping Case: भिवंडीत राहणाऱ्या एका ३० वर्षीय मैत्रिणीचे तिच्याच मुंबईत राहणाऱ्या मैत्रिणीने अपहरणाचा कट रचत ६ साथीदारांच्या मदतीने अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. खळबळजनक बाब म्हणजे, मैत्रिणीचे अपहरण करून तिच्या मुलाकडून आईच्या सोडवणुकीसाठी ३ लाखांच्या खंडणीची मागणी केली. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अपहरणकर्त्या मैत्रिणीसह ७ जणांच्या टोळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कविता सिंह व तिच्या अन्य तीन मैत्रिणी आणि इतर तीन पुरुष साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर सोनाली अजय जाधव (वय ३०) असे अपहरण झालेल्या महिलेचे नाव आहे.

पैशाच्या कारणावरून जिवलग मैत्रिणीत वाद: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहृत ३० वर्षीय महिला ही भिवंडीतील कल्याण नाका रोडवरील साईबाबा मंदिरासमोरील ओमसाई अपार्टमेंटमध्ये राहते. तर मुख्य आरोपी कविता सिंह मुंबईतील चेंबूर येथे वास्तव्यास असून सोनाली व कविता ह्या दोघी चांगल्या आणि जिवलग मैत्रिणी असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान या दोघींमध्ये पैश्यांच्या व्यवहारातून काही दिवसांपासून वाद सुरू होता. अखेर हा वाद अधिक वाढल्याने आरोपी कविताने तिच्या तीन मैत्रिणींसह अन्य तीन पुरुषांसोबत मिळून अपहरणचा कट रचला. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता (कार) चारचाकी वाहनाने अपहरणकर्ते मुंबईहून भिवंडीत आले. त्यानंतर सोनालीवर पाळत ठेवून राहत्या घरातून कारमध्ये कोंबून तिचे अपहरण केले आहे.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू: अपहरण केल्यानंतर मुख्य आरोपी कविताने सोनालीचा मुलगा यश जाधवला फोन केला आणि त्याच्या आईच्या सुटकेसाठी ३ लाखांच्या खंडणीची मागणी केली आहे. दरम्यान, अपहरण झालेल्या सोनालीच्या पतीचा चेंबूर येथील मित्र महेंद्र वासुदेव कहार याच्या फिर्यादीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात अपहरणकर्त्या मैत्रिणीसह ७ जणांच्या टोळी विरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे करीत आहेत.

हेही वाचा:

  1. Sasoon Drugs Case : ड्रग्ज माफिया ललित पाटील पळून जातानाचा CCTV समोर; सीसीटीव्हीतून धक्कादायक माहिती समोर
  2. Fraud : व्यवसायिकाला चौघांनी लावला 151 कोटींचा चुना
  3. Pune Crime : सोशल मीडियावरील ओळख पडली महागात; कॉलेज तरुणाचं अपहरण करुन केलं अनैसर्गिक कृत्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.