ठाणे - सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांनी मागील काही दिवसांपासून देशातील काही मोठ्या लोकांकडून आपल्याला धमक्या येत असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली. अदर पूनावाला यांना धमकी कोणी दिली? याबाबतची माहिती पुढे यायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, याबाबत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार
आज भारतात अनेक लोकांचे प्राण वाचवण्याचे काम सीरम इन्स्टिट्यूट करत आहे. अचानक लसीचे उत्पादन लंडनला घेऊन जातो, असे पुनवाला का म्हणाले? याची संपूर्ण सत्यता भारताला समजली पाहिजे. खास करून महाराष्ट्राने याप्रकरणात लक्ष घातले पाहिजे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
![jitendra Awhad reaction on Adar Poonawala](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11608102_3_11608102_1619889653949.png)
लंडनच्या एका वृतपत्रात दिलेल्या मुलाखतीत खुलासा
पूनावाला यांनी लंडनच्या एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांना मोठ्या लोकांकडून धमक्या येत असल्याचे त्यांनी म्हटले.
हेही वाचा- राज्यात सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता - आरोग्यमंत्री राजेश टोपे