ठाणे - आमच्या विविध मागण्यासाठीच मतदानाचा हक्क बजावला असल्याचे कल्याण पूर्वेतील जवळपास ५० तृतीयपंथीयांनी सांगितले. विशेष म्हणजे गेल्या ५ वर्षांपूर्वीच त्यांना निवडणूक आयोगाकडून मतदानाचा हक्क देण्यात आला आहे.
हेही वाचा - कोथरूडमध्ये वनवे तर कोल्हापुरात युतीच्या 10 जागा येणार - चंद्रकांत पाटील
जिल्ह्यातील विविध शहरात तृतीयपंथी मोठ्या संख्येने राहतात. मात्र, बहुतांश तृतीयपंथीयांनी मतदार यादीत नोंदणी केल्याचे समोर आले. जिल्ह्यातील कल्याण पूर्वेमध्ये सर्वाधिक १६५ तृतीयपंथी मतदार आहेत. यातील अनेक तृतीयपंथी पदवीधर असून नोकरीच्या शोधात आहे. नोकरीत आरक्षण नसल्याने त्यांना सामाजिक जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे तृतीयपंथी आशु सानिया ठाकरे यांनी सांगितले. त्या म्हणल्या, कि मी स्वतः पदवीधर असूनही मला नोकरी मिळत नाही. त्यामुळे आमच्यावर बेरोजगारीचे संकट तर आहेच शिवाय इतर नागरिकांना मिळत असलेल्या विविध शासकीय सुविधाही मिळत नाही. त्यामुळे येणाऱ्या सरकारला आमच्या विविध मागण्यांसाठी काम करावे यासाठी आम्ही मतदान केले आहे. यावेळी मी दुसऱ्यांदा मतदान करीत असल्याचे आशुने सांगितले.