ETV Bharat / state

बदलापूर, उल्हासनगरमध्ये पाण्याच्या पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी - बदलापूर

बदलापूरच्या कात्रप चौक परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. तर उल्हासनगरमध्येही कुर्ला कॅम्प चौकात पालिकेची पाईपलाईन फुटली आहे.

उल्हासनगरमध्ये आणि बदलापूर येथे पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे.
author img

By

Published : May 25, 2019, 6:53 PM IST

ठाणे- बदलापूरच्या कात्रप चौक परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. ही पाईप लाईन गेल्या तासाभरापासून फुटल्याने त्यामधून पाण्याचे 30 ते 40 फूट उंचच-उंच कारंजे उडत आहेत. तर उल्हासनगरमध्येही कुर्ला कॅम्प चौकात पालिकेची पाईपलाईन फुटली आहे. आधीच शहरात पाणीटंचाई असताना हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याने परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

उल्हासनगरमध्ये आणि बदलापूर येथे पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे.

बदलापूर शहरात भीषण पाणी टंचाई असल्याने येथील नागरिकांना पाणीटंचाई झळ जाणू लागली आहे. त्यामुळे विविध शहरातील सोसायट्या, इमारतीमधील रहिवाशी टँकरच्या पाण्यावर अवलंबून असल्याचे दिसून आले आहे. बदलापूर –अंबरनाथ, उल्हासनगर शहरात पाणीटंचाईमुळे एप्रिल महिन्यातच टँकर लॉबी सक्रीय झाली आहे. पिण्याच्या पाण्यासोबत आता इमारतीच्या बांधकामासाठीही पाणीपुरवठा थेट उल्हास नदीतून उचलण्यात येत आहे. दरदिवशी शंभरहून अधिक टँकर पाणी चोरून सोसायट्यांमध्ये १ ते २ हजार रुपयांना विक्री करीत आहे.

घटनास्थळी बदलापूर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले असून जलवाहिनी दुरूस्तीचे काम सुरू केले आहे. त्यातच उल्हासनगर शहरातील कुर्ला कॅम्प चौकातही पालिकेची पाईपलाईन फुटल्याने आधीच शहरात पाणीटंचाई असताना हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. सुमारे दोन तासापासून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. आतापर्यंत महानगरपालिकेचा एकही आधिकारी या ठिकाणी फिरकला नाही. अशा प्रकारचे पाणी गळती म्हणजे पाणीपुरवठा विभागाचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे

पाणी टंचाईतच बदलापूर, उल्हासनगरमध्ये पाण्याच्या पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी

ठाणे :- बदलापुरच्या कात्रप चौक परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. हि पाईप लाईन गेल्या तासाभरापासून फुटल्याने त्यामधून पाण्याचे 30 ते 40  फुट उंचच-उंच कारंजे उडत आहे. तर उल्हासनगरमध्येही कुर्ला कॅम्प चौकातही पालिकेची पाईपलाईन फुटल्याने आधीच शहरात पाणीटंचाई असताना हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याने परिसरातील नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.

बदलापूर शहरात भीषण पाणी टंचाई असल्याने येथील नागरिकांना पाणीटंचाई झळ जाणू लागल्याने विविध शहरातील सोसायट्या, इमारतीमधील रहिवाशी टँकरच्या पाण्यावर अवलंबून असल्याचे दिसून आले आहे. बदलापूर –अंबरनाथ, उल्हासनगर  शहरात पाणीटंचाईमुळे एप्रिल महिन्यातच टँकर लॉबी सक्रीय झाली आहे. पिण्याच्या पाण्यासोबत आता इमारतीच्या बांधकामासाठीही पाणीपुरवठा थेट उल्हास नदीतून उचलण्यात येत आहे. दरदिवशी शंभरहून अधिक टँकर पाणी चोरून सोसायट्यांमध्ये १ ते २ हजार रुपयांना विक्री करीत आहे.

दरम्यान, घटनास्थळी बदलापूर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचून जलवाहिनी दुरूस्तीचे काम सुरु केले आहे. त्यातच उल्हासनगर शहरातील कुर्ला कॅम्प चौकातही पालिकेची पाईपलाईन फुटल्याने आधीच शहरात पाणीटंचाई असताना हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे. सुमारे दोन तासापासून  हजारो लिटर पाणी वाया जात असून आतापर्यंत महानगरपालिकेचा एक आधीकारी या ठिकाणी फिरकला नसल्याने अशा प्रकारचे पाणी लीकेज म्हणजे पाणीपुरवठा विभागाचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.