ETV Bharat / state

ठाण्यात काही भागात वीजपुरवठा अजुनही खंडित; पाणीपुरवठा सुरू - thane electricity supply

ठाण्यातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. मात्र, काही भागात अजूनही वीजपुरवठा खंडित आहे. लवकरच तोदेखील लवकरच सुरळीत करण्यात येईल, असे आश्‍वासन शासनातर्फे देण्यात आले आहे.

thane electricity
ठाणे वीजपुरवठा
author img

By

Published : Oct 12, 2020, 4:07 PM IST

ठाणे - आज (सोमवारी) सकाळपासून येथे वीजपुरवठा खंडित झाला होता. यानंतर दुपारपर्यंत काही भागात हा वीजपुरवठा सुरू झाला. मात्र, ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे काम वीजपुरवठा खंडित झाल्याने पूर्णतः ठप्प झाले होते. मात्र, दुपारी महावितरणकडून सेवा पूर्ववत केल्यानंतर ठाणे महानगरपालिकेचा पाणीपुरवठा सुरुळीत झाला.

माहिती देताना प्रतिनिधी

या वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे ठाणे शहरात रात्री उशिरापर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. यासोबत ठाण्यातील काही भागात अजूनही वीज पुरवठा खंडीत आहे. लवकरच तोदेखील लवकरच सुरळीत करण्यात येईल, असे आश्‍वासन शासनातर्फे देण्यात आले आहे.

यादरम्यान, होण्यात कोणाकडूनही विद्युत उपकरण किंवा साहित्याच्या नुकसान झालेल्याची माहिती प्रशासनाला दिलेली नाही. त्यामुळे सर्व रुग्णालय आणि व्यावसायिक आस्थापना सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

ठाण्यात दोन कोविड रुग्णालयात जनरेटरची सुविधा असल्यामुळे तेथे रुग्णांना कोणतीही अडचण आली नाही. मात्र, सकाळी अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने लाखो ग्राहकांना त्याचा फटका बसला. ऐन कामावर जाण्याच्यावेळी वीज नसल्याने मध्य रेल्वे आणि चाकरमान्यांना त्याचा फटका बसला.

पाणीपुरवठा सुरू -

पडघा येथील महाराष्ट्र राज्या विद्युत विकास महामंडळातर्फे (MSEDCL) यांच्याकडुन होणारा विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. यामुळे टेमघर येथील ठाणे मनपाचे आणि स्टेम प्राधिकरणाचे पूर्ण पंपिंग बंद झाले होते. यामुळे ठाणे शहरास होणारा पाणी पुरवठा बंद झाला. हा विद्युत पुरवठा सुरू झाला आहे. पिसे आणि टेमघर येथील पंपिंग सुरू करण्यात आले आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. तरी पण आज रात्री कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.