ठाणे - भिवंडी शहर महानगर पालिका क्षेत्रातील पाणी पुरवठा शुक्रवारी 24 तासांसाठी बंद राहणार आहे. महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणी पुरवठा करणाऱ्या स्टेम वॉटर डिस्ट्रीब्यूशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा.लि.(स्टेम) तर्फे ठाणे महानगरपालिका एकत्र असलेल्या जलवाहिन्यांच्या साकेत येथील प्लेट बदली करून नवीन प्लेट टाकण्याच्या कामासंदर्भात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
हेही वाचा - भिवंडीत अंधश्रद्धेपोटी महिलेला मारहाण करून कापले केस; भोंदूबाबासह 3 साथीदारांवर गुन्हा दाखल
स्टेम कंपनीमार्फत भिवंडी शहराला होणारा पाणीपुरवठा शुक्रवारी सकाळी 9 ते शनिवारी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना पुढील आणखी एक दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी याची नोंद घेऊन भिवंडी महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.