ETV Bharat / state

जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी ठाण्यात २ दिवस पाणी पुरवठा राहणार बंद - Water supply cut off news thane

जांभूळ जलशुद्धीकरण येथील जलवाहिन्यांची तातडीने देखभाल दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने गुरुवार 7 जानेवारी रात्री 12.00 ते शुक्रवार रात्री 12.00 वाजेपर्यंत 24 तासासाठी शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे.

thane mnc water supply
ठाणे महापालिका
author img

By

Published : Jan 6, 2021, 7:26 PM IST

ठाणे - जांभूळ जलशुद्धीकरण येथील जलवाहिन्यांची तातडीने देखभाल दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने गुरुवार 7 जानेवारी रात्री 12.00 ते शुक्रवार रात्री 12.00 वाजेपर्यंत 24 तासासाठी शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे. यामुळे ठाणे महापालिकेतील काही भागांमध्ये सदर कालावधित पाणीपुरवठा बंद असणार आहे.

या भागांमध्ये पाणीपुरवठा असणार बंद

ठाणे महानगरपालिकेच्या कळवा, खारेगाव, पारसिकनगर, आतकोनेश्वर नगर, घोलाईनगर, रेतीबंदर, विटावा, मुंब्रा, दिवा, शिळ, कौसा, डायघर, देसाई, तसेच इंदिरानगर, रुपादेवीपाडा, वागळे फायर ब्रिगेड, बाळकुम पाडा क्र.1 या ठिकाणी एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा 24 तास पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा - कल्याणच्या राडेबाज भाजप नगरसेकाला शनिवारपर्यत पोलीस कोठडी

ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेंतर्गत श्रीनगर जलकुंभ येथील जलवाहिनीवरील इनलेट एअर व्हॉल्व बदली करणे, विवियाना जलकुंभाच्या इनलेट जलवाहिनीस क्रॉस कनेक्शन करणे, महात्मा फुले नगर येथील मुख्य जलवाहिनीवरील पाण्याची गळती काढणे इत्यादी कामे करण्यासाठी 8 जानेवारी रोजी सकाळी 9.00 ते शनिवार सकाळी 9.00 वाजेपर्यत 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद करण्याचे ठरले आहे. त्यामुळे, ठाणे महानगरपालिकेच्या सिद्धेश्वर, जॉन्सन, समतानगर, इटर्निटी, जेल परिसर, साकेत, ऋतूपार्क, घोडबंदर रोड, कोठारी कंपाऊंड, इंदिरानगर, लोकमान्यनगर, गांधीनगर, किसननगर, श्रीनगर, वागळे इस्टेट, कळव्याचा काही भाग व मुंब्र्याचा काही भाग इत्यादी ठिकाणचा पाणीपुरवठा 24 तास पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे.

पुढील दोन दिवस राहणार परिणाम

या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा - वेगवेगळ्या विभागाच्या समन्वयातून पालिका प्रशासनाकडून होतोय शहराचा विकास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.