ETV Bharat / state

धरण उशाला कोरड घशाला, शहापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई - shahapur

तालुक्यातील मोडकसागर धरण हे ज्या टेंभा ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. त्याच ग्रामपंचायतीमधील १५ गाव-पाड्यांना आज भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

शहापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई
author img

By

Published : May 5, 2019, 9:46 AM IST

ठाणे - शहापूर तालुक्यात भीषण पाणीटंचाईला फेब्रुवारी महिन्यातच सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील आदिवासी वाड्यांसह धरणाच्या पायथ्याशी असलेल्या गावांनाही एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. धरणांच्या काठावरील गाव-पाड्यांना हंडाभर पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. यामुळे पाणीपुरवठा विभागाचे अपयश दिसून आले असून पाणीपुरवठा योजनांचा तालुक्यात अक्षरशः बोजवारा उडाला आहे.

मुंबई, ठाणे महानगरीची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यात मोडकसागर, भातसा, तानसा, मध्य वैतरणा ही महत्त्वाची धरणे आहेत. याच धरणांमधून मुंबई, ठाणे शहराला लाखो लिटर पाणीपुरवठा दिवस-रात्र केला जातो. मात्र तालुक्यातील मोडकसागर धरण हे ज्या टेंभा ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. त्याच ग्रामपंचायतीमधील १५ गाव-पाड्यांना आज भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. धरण उशाला पण कोरड घशाला अशी अवस्था येथील ग्रामस्थांची झाली आहे. येथील १ हजार ३८८ आदिवासी लोकसंख्या असलेल्या १५ पाड्यांना दिवसाआड टँकरने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे टँकर आल्यावर हंडाभर पाण्यासाठी विहिरींवर झुंबड उडते. टेंभा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत ८ कूपनलिका असून त्या नादुरुस्त आहेत. त्या कूपनलिका दुरुस्त केल्यास काही प्रमाणात पाणीटंचाई दूर होण्यास मदत होवू शकते, असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

शहापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई

तर डोळखांब - कसारा या मुख्य रस्त्यावरून २ किमी दुर्गम भागात तसेच तळवडे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गांडूळवाड या गावातही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विहिरी आटल्याने आणि पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्यामुळे येथील महिलांना आणि पुरुषांना टँकरने आलेले पाणी पुरत नसल्याने ३ किमी अंतरावरील एका खाजगी फार्महाऊसमधून आपली पाण्याची गरज भागवावी लागत आहे. पाणी योजनेचा उडालेला बोजवारा, टँकरचे अपुरे पाणी, गावातील विहिरींमध्ये पाणी नसल्याने फेब्रुवारी महिन्यातच पाण्याशिवाय येथील लोकांच्या घशाला कोरड पडली आहे. दरवर्षी होणाऱ्या या पाणी समस्येने येथील महिला वर्ग कमालीचा संतप्त झाला असून शासनाचा पाणीपुरवठा विभाग किमान आतातरी शहापूर तालुक्यातील नागरिकांच्या कोरड पडलेल्या घशाला घोटभर पाणी देणार का ? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

शहापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटर महिलांची पायपीट ...

ठाणे : शहापूर तालुक्यात भीषण पाणीटंचाईला फेब्रुवारी महिन्यातच सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील आदिवासी वाड्यांसह धरणाच्या पायथ्याशी असलेल्या गावांनाही एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मात्र याच धरणांच्या काठावरील गाव-पाड्यांना जर हंडाभर पाण्यासाठी ३ ते ४ किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. यामुळे पाणीपुरवठा विभागाचे अपयशच दिसून आले असून पाणीपुरवठा योजनाचा तालुक्यात अक्षरशः बोजवारा उडाला आहे.  

मुंबई, ठाणे महानगरीची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यात मोडकसागर, भातसा,  तानसा, मध्य वैतरणा ही महत्त्वाची धरणे आहे. याच धरणांमधून मुंबई, ठाणे शहराला लाखो लिटरपाणीपुरवठा दिवस-रात्र केला जातो. मात्र तालुक्यातील मोडकसागर धरण हे ज्या टेंभा ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. त्याच ग्रामपंचायतीमधील १५ गाव-पाड्यांना आज भीषण पाणी टंचाई सामना करावा लागत आहे.  धरण उशाला पण कोरड घशाला अशी अवस्था येथील ग्रामस्थांची झाली आहे. येथील मोरघ्याचापाडा, शाळेचापाडा, पारधीपाडा, गावठाणपाडा, वाखपाडा, आंबिवली कातकरिवाडी,  टेंभा खैरपाडा, पागीपाडा, रोजपाडा,  उंबरपाडा,  बळवंडी,  खरपडे पाडा,  थालकर पाडा, पारधीपाडा या १ हजार ३८८ आदिवासी लोकसंख्या असलेल्या १५ पाड्यांना दिवसाआड टँकरने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे टँकर आल्यावर हंडाभर पाण्यासाठी विहिरींवर झुंबड उडते. मोडकसागर धरणाच्या खाली एक पाण्याचा व्हॉल असून याठिकाणी जर शासकीय टँकर भरण्याचे काम केले.  तर टेंभा ग्रामपंचायती बरोबर खर्डी परिसरातील दहीगाव, वरस्कोल, खर्डी या ठिकाणीदेखील रोज टँकरने पाणीपुरवठा करणे शक्य होईल. तसेच टेंभा ग्रामपंचायतीच्या अंतर्गत ८ कूपनलिका असून त्या नादुरुस्त आहेत. त्या कूपनलिका दुरुस्त्य केल्या, तरी काही प्रमाणात पाणीटंचाई दूर होण्यासाठी मदत होवू शकते असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

तर  डोळखांब - कसारा या मुख्य रस्त्यावरून २ किमी. दुर्गम भागात तसेच तळवडे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गांडूळवाड या गावातही भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. १३५ घरांची वस्ती, १२०० च्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तळवडे ग्रामपंचायत हद्दीत २००४ साली जलस्वराज्य योजनेमधून १ कोटींचा निधी खर्च करून नळ योजनासाठी एक टाकी बांधण्यात आली होती. मुख्य रस्त्यापासून २ किमी. अंतरावर असलेल्या गावापर्यंत २२ लाखांचा निधी पाणीपुरवठा विभागामार्फत खर्च करण्यात आला होता. मात्र योग्य नियोजनाअभावी या टाकीत पाणीच चढत नसल्याने ही नळ योजना बारगळली. तर डोळखांब धरणाच्या विहिरीतून गांडूळवाड येथील विहिरीत टाकण्याचा प्रयत्न केला. तरीही ही योजना अयशस्वीच ठरली. १२ दिवसांपूर्वी ही योजना पुन्हा चालू करून पाणी देण्याचा प्रयत्न केला गेला. तरीही येथील विहिरीत पाणी पोहोचतच नसल्याने महिला त्रस्त झाल्या आहेत. येथील महिलांना कपडे धुण्यासाठी पुरुषाच्या मदतीने डोळखांब धरण किंवा  नजीकच्या नदी जावे लागत आहे. या ठिकाणी असलेल्या विहिरी आटल्याने  पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याने येथील महिलाना व पुरुषांना टँकरने आलेलेपाणी पुरत नसल्याने ३ किमी. अंतरावरील एका खाजगी फार्महाऊसमधून आपली पाण्याची गरज भागवावी लागत आहे. पाणी योजनेचा उडालेला बोजवारा, टँकरचे अपुरे पाणी, गावातील विहिरींमध्ये पाणी नसल्याने फेब्रुवारी महिन्यातच पाण्याशिवाय येथील लोकांच्या घशाला कोरड पडली आहे. पाण्याअभावी गांडूळवाड येथील आदिवासींचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. येथील जनावरेही पाण्याअभावी मृत पावत आहेत. येथे असणाऱ्या विहिरीच्या बाजूलाच 'पाणी आडवा पाणी जिरवा' योजनेसाठी एक बंधारा तयार करण्यात आला होता. परंतु प्रशासकीय दुर्लक्षामुळे हा बंधारा मृत्यूशय्येवर असल्याने पाणीच साठत नाही. दरवर्षी होणाऱ्या या पाणी समस्येने येथील महिला वर्ग कमालीच्या संतप्त झाल्याने शासनाच्या पाणीपुरवठा विभागाने किमान आतातरी शहापूर तालुक्यातील नागरिकांच्या कोरड पडलेल्या घशाला घोटभर पाणी देणार का ? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

I’m protected online with Avast Free Antivirus. Get it here — it’s free forever.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.