ETV Bharat / state

मायबाप सरकार, पाणी देता का पाणी? मुरबाड तालुक्यातील महिलांचा संतप्त सवाल - मुरबाड

येथील गावकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आतातरी मायाबाप सरकार पाणी देणार का? असा संतप्त सवाल मुरबाड तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त महिलांनी उपस्थित केला आहे.

मायबाप सरकार, पाणी देता का पाणी? मुरबाड तालुक्यातील महिलांचा संतप्त सवाल
author img

By

Published : May 6, 2019, 4:49 PM IST

ठाणे - मुरबाड तालुक्यातील बहुतेक भागातील विहिरींनी तळ गाठला असून येथील गावकऱ्यांना भीषण पाणीटंचाईला सामोर जावे लागत आहे. येथील गावकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आतातरी मायाबाप सरकार पाणी देणार का? असा संतप्त सवाल मुरबाड तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त महिलांनी उपस्थित केला आहे.

मायबाप सरकार, पाणी देता का पाणी? मुरबाड तालुक्यातील महिलांचा संतप्त सवाल

मुरबाड तालुक्यात बहुंताश ठिकाणी धरण-बंधारे आहेत. मात्र, या धरण-बंधारे परिसरातील गावांना हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. मुरबाडमधील पाडाळे धरणापासून अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या खोपीवली गावातील विहीरींनी तळ गाठला आहे. विषेश म्हणजे धरणासाठी ज्या गावातील गावकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. त्याच गावांना पिण्यासाठीसुद्धा पाणी मिळत नसल्याने, महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तर मुरबाड तालुक्यातील उंबरवाडी, झाडघर, साकुर्लीवाडी, कुडशेत या आदिवासी वाड्या पाड्यांमध्येही पाण्याची भीषण टंचाई सुरू आहे. काही ठिकाणी दर ३-४ दिवसाला पंचायत समितीमार्फत पाण्याचा १ टँकर विहरीमध्ये टाकला जातो. मात्र, हे पाणी गावातील लोकांना पिण्यासाठीही पुरत नसल्याने दररोज टँकरने पाणी पुरवठा व्हावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

  • शहापूर तालुक्यात पाणी योजनेचे तीनतेरा

शहापूर तालुक्यातील पाटोळपाडा या गावासाठी २००७-०८ मध्ये ५१.४३ लाखांच्या पाणी योजनेचे काम अर्धवट ठेवून कंत्राटदाराने गावकऱ्यांना पाणीटंचाईच्या दरीत ढकलले आहे. या परिसरातील पाणी योजना भातसा पाणलोट क्षेत्रात असूनही विहिरीवर राबवण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे पाणीटंचाई दूर होण्याचे स्वप्न अधांतरी आहे. जानेवारीतच विहिरी कोरड्या पडत असल्याने पाणीच आले नाही. संपूर्ण रात्रभर महिलांना पाण्यासाठी जागे राहावे लागत आहे. कूपनलिकांमधील पाणी संपले असून नागरिकांना ३ किमी अंतरावर दऱ्या-खोऱ्यामधून भातसा पाणलोट धरणक्षेत्रात पाणी आनण्यासाठी जावे लागत आहे.

  • लोकशाहीत पाण्याचा हक्क नाही का ? संतप्त आदिवासींचा सरकारला सवाल

शहापूर तालुक्यातील भातसा धरणक्षेत्रात असणाऱ्या अतिदुर्गम भाग म्हणून समजल्या जाणाऱ्या वेळूक ग्रामपंचायत हद्दीतील पाटोळपाडा, तेलमपाडा परिसरातही भीषण पाणी टंचाई आहे. येथे २ कूपनलिका, २ विहरी आहेत. मात्र, पाण्याच्या सगळ्या व्यवस्थेने तळ गाठल्याने आदिवासी पाड्यातील तेलमपाडा येथील महिलांना पुरुषांच्या मदतीने ४ टेकड्या पार करून भातसा धरणक्षेत्रात उतरून पाण्याची व्यवस्था करावी लागत आहे. लहान मुलाबाळांना घरी ठेवून संपूर्ण दिवस पाण्यासाठी खर्च करावा लागत आहे. पुरुषांनाही पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने रोजगार बुडत आहे. त्यामुळे पोट कसे भरायचे ? हा यक्षप्रश्न आदिवासींना पडला आहे.

पाणी टंचाईचा पंचनामा; मायबाप सरकार “पाणी देता का हो पाणी” महिलांचा संतप्त सवाल  

ठाणे :- मुरबाड तालुक्यातील बहुतेक भागातील विहिरींनी तळ गाठला असून येथील गावकऱ्यांना भीषण  पाणीटंचाईला सामोरं जावं लागतं असल्याने अक्षरशः गावकऱ्यांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. यामुळे आतातरी मायाबाप सरकार “पाणी देता का हो पाणी” असा संतप्त सवाल मुरबाड तालुक्यातील पाणी टंचाईने ग्रस्त झालेल्या महिलांनी उपस्थित केला आहे.    

मुरबाड तालुक्यात बहुंताश ठिकाणी धरणं-बंधारे आहेत. मात्र या धरण-बांघारे परिसरातील गावांना हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. मुरबाड मधील पाडाळे धरणापासून अवघ्या काही  अंतरावर असणाऱ्या खोपीवली गावातील विहीरींनी तळ गाठला असून येथील नागरिकांना भीषण  पाणीटंचाईला सामोरे जावं लागत आहे. विषेश म्हणजे धरणासाठी ज्या गावातील गावकऱ्यांच्या जागा-जमिनी गेल्या आहेत. त्याच गावांना प्यायला पाणी मिळत नसल्याने महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

 तर मुरबाड तालुक्यातील उंबरवाडी, झाडघर, साकुर्लीवाडी, कुडशेत या  आदिवासी वाड्या पाड्यांमध्ये भिषण पाणी टंचाई सुरु झाली आहे. काही टंचाईग्रस्त ठिकाणी दर तीन चार दिवसाला पंचायत समितीमार्फत पाण्याचा एक टँकर विहिरीत टाकला जातो. मात्र हे पाणी या गावातील लोकांना पिण्यासाठीही पुरत नसल्याने दररोज टँकरने पाणी पुरवठा व्हावा अशी मागणी गावक-यांकडून होत आहे.

शहापूर तालुक्यातही पाणी योजनेचे वाजले तीनतेरा

शहापूर तालुक्यातील पाटोळपाडा या गावासाठी २००७-०८ मध्ये ५१.४३ लाखांच्या पाणी योजनेचे काम अर्धवट ठेवून कंत्राटदाराने गावकऱ्यांना पाणीटंचाईच्या दरीत ढकलले आहे. या परिसरातील पाणी योजना भातसा पाणलोट क्षेत्रात असूनही विहिरीवर राबवण्याचा घाट घातला जात असल्याने पाणीटंचाई दूर होण्याचे स्वप्न अधांतरी आहे. जानेवारीतच विहिरी कोरड्या पडत असल्याने पाणीच आले नाही. संपूर्ण रात्र महिलांना पाण्यासाठी जागावे लागते. कूपनलिकांमधील पाणी संपले तर तीन किमी अंतरावर दऱ्या-खोऱ्यामधून भातसा पाणलोट धरणक्षेत्रात जावे लागत असल्याने स्वत:ची सुरक्षा धोक्यात येत असल्याचे विदारक चित्र आहे.

लोकशाहीत पाण्याचा हक्क नाही का ? संतप्त आदिवासींचा सरकारला सवाल

शहापूर तालुक्यातील भातसा धरणक्षेत्रात असणाऱ्या अतिदुर्गम भाग म्हणून समजल्या जाणाऱ्या वेळूक ग्रामपंचायत हद्दीतील पाटोळपाडा, तेलमपाडा परिसर भीषण पाणीटंचाईग्रस्त झाला आहे. येथे दोन कूपनलिका, दोन विहिरी आहेत. मात्र पाण्याच्या सगळ्या व्यवस्थेने तळ गाठल्याने या आदिवासी पाडा आणि तेलमपाडा येथील महिलांना पुरुषांच्या मदतीने चार टेकड्या पार करून भातसा धरणक्षेत्रात उतरून पाण्याची व्यवस्था करावी लागते. लहान मुलाबाळांना घरी ठेवून संपूर्ण दिवस पाण्यासाठी खर्च करावा लागतो. पुरुषांनाही पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने रोजगार बुडत आहेत. त्यामुळे पोट कसे भरायचे ?  हा यक्षप्रश्न आदिवासींना पडला आहे. या गावातील महिलांना चार किमी असलेल्या सुसरवाडी येथील साठलेल्या पाण्यात कपडे धुण्यास जावे लागते. येथील पाणीही प्रदूषित असल्याचे आढळले आले. तर साठलेल्या पाण्याच्या आजूबाजूची परिस्थिती अत्यंत बिकट आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.