ठाणे - मुंबई व उपनगराला पावसाने शुक्रावारपासून चांगलेच झोडपले आहे. ठाण्यातील मासुंदा तलाव पावसाच्या पाण्याना भरून ओसंडून वाहत आहे. यामुळे तलाव परिसरातील रस्त्यावर पाणी साचले आहे.
मागील दोन दिवसांपासून ठाण्यात सतत पडणाऱ्या पावसाने ठाणे शहरातील मासुंदा तलावाच्या परिसरात पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यामुळे वाहनधारकांना फटका बसत असून वाहने धीम्या गतीने जाताना दिसत आहे. या भागात लहान नाले व्यवस्थित साफ न केल्यामुळे अशा सखोल भागात पाणी साचत आहे. ठाण्यात जवळपास १० ते १५ सखोल भागात पाणी साचत आहे. पावसाने जर जोर धरला तर या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचू शकते. ठाण्यात आता पर्यंत २०० मिली पाऊस पडला असून एकूण कालपर्यंत ६०० मिली पावसाची नोंद झाली आहे.