ETV Bharat / state

७२ तासापासून मुसळधार पाऊस; ठाणे जिल्ह्यात पुन्हा २६ जुलैची आठवण - एकनाथ शिंदे

मुसळधार पावसाने महाभयंकर पूरपरिस्थिती निर्माण केली असून जिल्ह्यातील विविध शहरासह तालुक्यातील नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे या नदी-नाल्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने लाखो कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. तसेच, या मुसळधार पावसाने विविध शहरातील झाडे, भिंती कोसळल्याच्या अनेक दुर्घटना ७२ तासात घडल्या आहेत.

७२ तासापासून मुसळधार पाऊस
author img

By

Published : Aug 4, 2019, 8:41 PM IST

Updated : Aug 5, 2019, 1:41 AM IST

ठाणे - सलग ७२ तासाहून अधिक काळ मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जिल्ह्यातील सर्वच शहरासह ग्रामीण भागातील लाखो नागरिकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. तर जू गावात अनेक नागरिक पाण्यात अडकले होते. त्यामुळे तेथे एअरलिफ्ट करून नागरिकांचे प्राण वाचवण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा २६ जुलै २००५ च्या पुराची आठवण झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात ७२ तासापासून मुसळधार पाऊस

मुसळधार पावसाने महाभयंकर पूरपरिस्थिती निर्माण केली असून जिल्ह्यातील विविध शहरासह मुरबाड, भिवंडी, शहापूर कल्याण, अंबरनाथ तालुक्यातील नदीनाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे या नदी-नाल्यालगतच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने लाखो कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. तसेच, या मुसळधार पावसाने विविध शहरातील झाडे, भिंती कोसळल्याच्या अनेक दुर्घटना ७२ तासात घडल्या आहेत. जिल्ह्यातील सर्वच महानगरपालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांसोबत त्या त्या परिसरातील पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी पाहणी करून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. तसेच त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या.

भातसा नदीकिनारी वसलेल्या कळंबेवाडी, सोर, आवाली, वांद्रे, ओझली, आतकोली, भादाणे, अर्जुनली, चिराडपाडा, पिसे, कोंडेरी, सागोडे, नटघर, किरवली, सांगे, देवरुंग, बापगांव, नांदकर आदी १७ गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहेत. त्यामुळे कल्याण आणि भिवंडी तसेच उल्हासनगर उपविभागीय अधिकारी यांनी प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारासह स्थानिक पोलीस व एनडीआरएफ जवानांच्या मदतीने येथील २ हजार नागरिकांना सुरक्षितपणे अन्य ठिकाणी हलवण्यात आले. मात्र, हवामान खात्याने पुढील ७२ तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असल्यास घराबाहेर पडावे. अन्यथा जीव धोक्यात घालून बाहेरील प्रवास करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

नागरिकांच्या मदतीसाठी एअरलिफ्ट

दरम्यान, जू गावाला चारी बाजूने पाण्याने वेढले होते. त्यामुळे गावामधील नागरिकांचे प्राण धोक्यात आले होते. तर जीवाच्या आकांताने मदतीसाठी नागरिक आवाज देत होते. एका फोन कॉलवरती या संपूर्ण गावातील नागरिकांना मदत मिळाली. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि एअरफोर्सच्या मदतीने याठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. येथील नागरिकांच्या मदतीसाठी ठाणे परिसरातल्या एका शाळेमध्ये एअरलिफ्ट करण्यात आले आणि नागरिकांचे प्राण वाचवण्यात आले. तसेच या सर्व नागरिकांना कुटुंबासह राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Intro:Body:

state

Conclusion:
Last Updated : Aug 5, 2019, 1:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.