ETV Bharat / state

तर्राट वार्डबॉयने दिले कळवा रूग्णालयाच्या हिरवळीतच ताणून - kalwa hospital

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील एका वॉर्डबॉयने दारू पिऊन रूग्णालयाच्या आवारातच फाईलीसह झोपी गेला.

हिरवळीत ताणून दिलेला वॉर्डबॉय
author img

By

Published : Nov 14, 2019, 10:20 PM IST

ठाणे - कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील नाथा नामक वॉर्डबॉय दारू पिऊन तर्राट होऊन रूग्णालयाच्या आवारातच पडल्याची घटना काल (बुधवार) पाहायला मिळाली. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय नेहमी विविध कारणांमुळे गाजत असते.

हेही वाचा - 'फेसबुक'वरील मैत्री पडली महागात; मैत्रिणीने घातला मित्राला गंडा

या रूग्णालयात रोज हजारो रूग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे या रूग्णालयात नेहमी गर्दी असते. काल (बुधवार) संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एक वॉर्डबॉय महत्वाच्या कागदपत्रांसह दारूच्या नशेत रूग्णालयाच्या आवारातच पडल्याची घटना घडली. हा वॉर्डबॉय ऑर्थोपेडिक विभागात काम करतो. डॉक्टरांनी त्याच्याकडे महत्वाच्या कागदपत्रांची फाईल दिली होती. मात्र, त्याने ही फाईल संबंधित विभागात न पोहोचवता दारूच्या नशेत रूग्णालयाच्या आवारातील हिरवळीवरच झोपी गेला.

हेही वाचा - झाडाझुडुपात आढळली एक महिन्याची जिवंत 'नकोशी', परिसरात खळबळ

त्याच्या जवळच कागदपत्रांची फाईल पडली होती. रूग्णालयाच्या आवारात गस्त घालणाऱ्या सुरक्षा रक्षकांना हे दिसले आणि त्यांनी ही बाब रूग्णालयाच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणली. काल रात्री ११ वाजता त्याला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

हेही वाचा - शाळकरी मुलावर तरूणाचा अनैसर्गिक अत्याचार; नराधम गजाआड

Intro:कळवा रुग्णालयाच्या तर्राट वॉर्डबॉयचे प्रतापBody:

कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयातील नाथा नामक वॉर्डबॉय दारू पिऊन तर्राट होऊन रूग्णालयाच्या आवारातच पडल्याची घटना काल पहायला मिळाली. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय नेहमी या ना त्या कारणामुळे गाजत असते.या रूग्णालयात रोज हजारो रूग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे या रूग्णालयात नेहमी गर्दी असते. काल संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एक वॉर्डबॉय महत्वाच्या कागदपत्रांसह दारूच्या नशेत रूग्णालयाच्या आवारातच पडल्याची घटना घडली. हा वॉर्डबॉय ऑर्थोपेडिक विभागात काम करतो. डॉक्टरनी त्याच्याकडे महत्वाच्या कागदपत्रांची फाईल दिली होती. मात्र त्यानं ही फाईल संबंधित विभागात न पोहचवता दारूच्या नशेत रूग्णालयाच्या आवारातील हिरवळीवरच झोपी गेला. त्याच्या जवळच कागदपत्रांची फाईल पडली होती. रूग्णालयाच्या आवारात गस्त घालणा-या सुरक्षा रक्षकांना हे दिसले आणि त्यांनी ही बाब रूग्णालयाच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणली.काल रात्री ११ वाजता त्याला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.