ठाणे : गेले काही दिवस दसरा मेळाव्यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असतांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाने शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना अखेर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. या दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी औरंगाबाद मधील खुलताबाद तालुक्यातील पाडळी येथील एक शिवसैनिक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांना समर्थन देण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी औरंगाबादहून मुंबईकडे जाण्यासाठी पायी चालत ( walk Drive from Aurangabad to Mumbai ) निघाला आहे.
दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी मुंबईकडे चालत निघालो : ज्ञानेश्वर आहेवाड अस या निष्ठावंत शिवसैनिकाचे नाव असून आज तो ठाण्यात पोहोचला आहे. ज्ञानेश्वर हा शेतकरी कुटुंबातील 27 वर्षांचा तरुण आहे. ज्ञानेश्वर चे आई वडील व भाऊ, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित असलेले जुने शिवसैनिक आहेत. सत्ता स्थापनेसाठी एकनाथ शिंदे यांनी केलेली शिवसेनेशी गद्दारी आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झालेले त्यांना मान्य नाही. उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचं रक्त आहे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच खरी शिवसेना त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांच्या बरोबर आहेत, माझ्यासारखे असंख्य तरुण आणि औरंगाबाद मधील हजारो निष्ठावंत शेतकरी, सामान्य नागरिक हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती असलेली निष्ठा आणि श्रद्धेपोटी मी औरंगाबादहून दसरा मेळाव्यात सहभागी होण्यासाठी मुंबईकडे चालत निघालो असल्याचं ज्ञानेश्वर सांगतात. तसंच जर आता बाळासाहेब ठाकरे असते तर या गद्दारांना क्षमा नसती, अशा भावना देखील ज्ञानेश्वर व्यक्त करत आहेत.
शिवसैनिक आज ठाण्यात दाखल : 27 सप्टेंबर रोजी ज्ञानेश्वरी यांनी पायी चालत मुंबईकडे येण्याचा प्रवास सुरू केला. त्यामध्ये त्यांना अनेक अडचणींना आणि अडथळ्यांना देखील सामोरे जावं लागलं, ऊन वारा पाऊस याला न जुमानता हा बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आज ठाण्यात दाखल झालेला आहे आणि पुन्हा उद्या सकाळी प्रवास करण्यास सुरुवात करणार आहे.
ठाण्याच्या खासदारांनी केला सत्कार : ज्ञानेश्वर ठाण्यात आल्याचं माहिती पडतात उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी त्वरित दखल घेत ज्ञानेश्वर ची भेट भेट घेऊन त्याचं स्वागत केलं. अशाच शिवसैनिकांमुळे शिवसेना पुन्हा उभी राहणार आहे अशा निष्ठावंत कार्यकर्त्याचा मला अभिमान आहे, ज्ञानेश्वर सारखे असंख्य निष्ठावंत शिवसैनिक हे दसरा मेळाव्यासाठी मुंबईत दाखल होणार आहेत त्यामुळे आमचा दसरा मेळावा हा निष्ठावंत शिवसैनिकांचा मेळावा असणार असल्याच राजन विचारे यांनी म्हटलं आहे.