ETV Bharat / state

राज्यातील 12 हजार पोलीस हवालदार पदोन्नतीच्या प्रतिक्षेत - THANE

पोलीस महासंचालक कार्यालयाने 2013 मध्ये घेतलेल्या अहर्ता परीक्षेत राज्यातील सुमारे 18 हजार पोलीस कर्मचारी उत्तीर्ण झाले होते. मात्र, त्यापैकी 12 हजार पोलीस हवालदार पोलीस उपनिरीक्षक पदाच्या पदोन्नतीपासून अजूनही वंचित आहेत. याबाबत पोलीस हवालदारांमध्ये निराशा आहे.

राज्यातील 12 हजार पोलीस हवालदार पदोन्नतीच्या प्रतीक्षेत
author img

By

Published : Jul 8, 2019, 9:17 AM IST

ठाणे - पोलीस महासंचालक कार्यालयाने 2013 मध्ये खात्यांतर्गत घेतलेल्या अहर्ता परीक्षेत राज्यातील सुमारे 18 हजार पोलीस कर्मचारी उत्तीर्ण झाले होते. मात्र, त्यापैकी केवळ अडीच हजार पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली. तर 12 हजार पोलीस हवालदार पोलीस उपनिरीक्षक पदाच्या पदोन्नतीपासून अजूनही वंचित आहेत.

पदोन्नतीसाठी पात्र असतानाही केवळ पोलीस महासंचालक कार्यालयाच्या अधीन असलेल्या आस्थापना विभागातील लिपिक आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या घोळामुळे पदोन्नती रखडल्याचा आरोप प्रतिक्षेत असलेल्या पोलीस हवालदारांनी केला आहे.

गेल्या सहा वर्षांपासून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची सेवा जेष्ठता यादी सुद्धा लावण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. महासंचालक कार्यालयाच्या आस्थापना विभागातील लिपिकांच्या लाल फितीशाहीमुळे राज्यातील 12 हजार पोलीस हवालदार पदोन्नती न झाल्यामुळे निराशेच्या गर्तेत सापडले आहेत.

पदोन्नती रोखल्याविरोधात अन्यायग्रस्त पोलीस हवालदार मेट न्यायालयात गेले आहेत. न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली असून यातील 636 जणांच्या पदोन्नतीच्या बाबत 5 जुलै रोजी मॅट न्यायालयाचे चेअरमन (न्यायाधीश) ए. एच. जोशी यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणाबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना धारेवर धरले आहे. आपल्याला 25 हजाराचा दंड का करू नये? अशी विचारणा त्यांनी केली आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाच्या गृह विभागात एकच खळबळ माजली आहे.

Intro:किट नंबर 319

Body:राज्यातील 12 हजार हवलदार पोलीस उपनिरीक्षक पदोन्नतीच्या प्रतीक्षेत

ठाणे :- राज्य शासनाच्या निदर्शनाने पोलीस महासंचालक कार्यालयाने खात्याअंतर्गत 2013 मध्ये घेण्यात आलेल्या अहर्ता परीक्षेत राज्यातील सुमारे 18 हजार पोलिस कर्मचारी उत्तीर्ण झाले होते त्यापैकी आज पाहतो केवळ अडीच हजार पोलिस कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे तर 12 हजार पोलिस हवालदार पोलीस उपनिरीक्षक पदाच्या पदोन्नतीपासून वंचित आहेत पदोन्नतीसाठी पात्र असतानाही केवळ पोलिस महासंचालक कार्यालयाच्या अधीन असलेल्या आस्थापना विभागातील लिपिक आणि अधिकारी ने केलेल्या घोळामुळे पदोन्नती रखडल्याचा आरोप प्रतीक्षेत असलेल्या हवालदाराने केला आहे, गेल्या सहा वर्षापासून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची सेवा जेष्ठता यादी सुद्धा लावल्यात आले नसल्याचे समोर आले आहे सदर बाब राज्य गृहमंत्रालयाची अन अस्थाने महासंचालक कार्यालयाच्या आस्थापना विभागातील लिपिकांची लाल फिती शाही मुळे पदोन्नती न झाल्यामुळे राज्यातील 12 हजार पोलिस हवालदार निराश झाल्याचे दिसून येत आहे,
दरम्यान, या पदोन्नती विरोधात अन्यायग्रस्त पोलीस हवालदार मेट कोर्टात गेले आहेत, त्याची कोर्टाने गंभीर दखल घेतली असून यातील 636 जणाच्या पदोन्नतीचा बाबत 5 जुलै रोजी मॅट कोर्टाचे चेअरमन( न्यायाधीश) ए, एच जोशी यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणा बाबत राज्याचे मुख्य सचिवांना धारेवर धरले असून आपल्याला 25 हजाराचा दंड का करू नये? अशी विचारणा केली आहे , त्यामुळे राज्य प्रशासनाच्या गृह विभागात एकच खळबळ माजली आहे,

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.