ठाणे: कोरोना आला आणि सगळे जग स्तब्ध झाले याच काळात या विषाणूंशी लढा देत असताना अर्णव आणि अर्णव चे कुटुंबीय देखील कोरोना पासून आपला बचाव करत होते. परंतु एका घडीला अर्णव च्या कुटुंबावर काळाने घाला घातला त्याच्या आई-बाबांना देखील कोरोनाची लागण झाली, उपचारासाठी अनेक ठिकाणी वणवण केल्यानंतर पुरेशी वैद्यकीय सेवा न मिळाल्यामुळे प्रथम अर्णवच्या बाबांना जीव गमवावा लागला त्यानंतर अवघ्या 10 दिवसातच अर्णव च्या आईला कोरोनाशी लढा देत असताना जीव गमावला लागला, या मुळे अर्णव च्या भविष्याचा चढता आलेखच थांबला या घटने नंतर अर्णव चा सांभाळ त्यांचे आजी आजोबा आणि मामा करत आहेत.
Waiting For Help: कोरोनाने आईवडलांपासून पोरके झालेल्या मुलांना मदतीची प्रतिक्षाच
संपूर्ण जगाला हादरवून सोडणार्या कोरोनामुळे अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले (Corona destroyed many homes) या विषाणूने कोणी आपले पती, कोणी आईवडील तर कोणी मुलेदेखील गमावले. यात अनेक कुटुंब असे आहेत ज्यांना उदरनिर्वाह कसा चालवायचा हा मोठा प्रश्न आहे तर काही कुटुंबांना सरकारकडून अजून मदतीची अपेक्षाच (Expect help from government) आहे. काही ठिकाणी थोड्या स्वरूपात मदत मिळाली आहे. पण घोषणे प्रमाणे सरकारची मदत न मिळल्यामुळे असे कुटुंब मदतीच्या प्रतिक्षेत (waiting for help ) आहेत.