ETV Bharat / state

Lok Sabha Election: भिंवडी लोकसभा मतदारसंघात ६ वाजेपर्यंत ५३.६८ टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदानाला उत्साहात सुरुवात झाली. सकाळी 7 वाजल्यापासून मतदारसंघातील मतदान केंद्रांवर मतदानाला सुरूवात झाली होती.

कल्याण पश्चिमेच्या शारदा मंदिर शाळेत सकाळीच मतदान करण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे
author img

By

Published : Apr 29, 2019, 9:05 AM IST

Updated : Apr 29, 2019, 9:26 PM IST

ठाणे - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज भिवंडी लोकसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदानाला सुरूवात झाली होती. भिवंडीत लोकसभेत भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाचे माजी खासदार सुरेश टावरे यांची लढत आहे.

भिंवडी लोकसभा मतदारसंघात मतदानासाठी मोठी गर्दी
  • ९.०० - सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५३. ६८ टक्के मतदान
  • ६.०० - सायंकाळी ५ वाजेपर्यंत भिवंडी ४८.९० टक्के मतदान
  • ०४.०० - दुपारी ३ वाजेपर्यंत ३९.३५ टक्के मतदान
  • ०१.०० - दुपारी एक वाजेपर्यंत २५.३८ टक्के मतदान
  • १२.०० - सकाळी ११ वाजेपर्यंत १७.२५ टक्के मतदान
  • ९.३० - सकाळी नऊ वाजेपर्यंत ६.२१ टक्के मतदान
  • ९.०० - काँग्रेसचे उमेदवार सुरेश तावरे यांनी केले मतदान
  • ८.०५ - भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी बजवला मतदानाचा हक्क.
  • ७.०० - मतदारसंघात मतदानाला सुरूवात

भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिमेच्या शारदा मंदिर शाळेत सकाळीच मतदान करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मतदारांसाठी फुलांच्या पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या. तसेच मतदान करून आलेल्या मतदारांचा तुळशीचे रोप आणि पेढे देऊन सत्कार केला जात होता.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात एकूण २,२०० मतदान केंद्र असून त्यासाठी एकूण १३ हजार कर्मचारी मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्ती करण्यात आले होते. या लोकसभा मतदारसंघात १८ लाख ८९ हजार ४४३ एवढे मतदार आहेत. ६ विधानसभा मतदार संघातील १,३५१ शासकीय इमारतीत २,१८९ मतदान केंद्र निर्माण करण्यात आली. या केंद्रावर २,१८९ केंद्राध्यक्ष आणि ६५६७ मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले. तर मतदानासाठी मतदान यंत्र २१८९ (बियु- बॅलेट पेपर युनिट ) आणि २१८९ (सीयु- कंट्रोल युनिट ) वापरण्यात आले.

Intro:किट नंबर 319

Body:सर, डेक्स व्हाट्सएपवर अपडेट पाठवले , त्या साठी बाईट आणि व्हिजवल

Conclusion:भिवंडी लोकसभा
Last Updated : Apr 29, 2019, 9:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.