नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai Agricultural Produce Market Committee ) १०० किलोप्रमाणे दोडक्याच्या दरात ६०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३८०० रुपये ते ४००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलोप्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलोप्रमाणे ६०० रुपये ते ७०० रुपये, गाजर प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २६०० रुपये, गवार प्रति १०० किलोप्रमाणे रुपये ४७०० ते ५२००रुपये, घेवडा प्रति १०० किलोप्रमाणे २५०० ते ३००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, कारली प्रति १०० किलोप्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलोप्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, कोहळा प्रति १०० किलोप्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये दर (Vegetables Rate Today in APMC Market Navi Mumbai) आहेत.
ढोबळी मिरची प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, पडवळ प्रति १०० किलोप्रमाणे २४०० रुपये ते २८००रुपये, रताळी प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलोप्रमाणे ९५०० रुपये ते ११००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलोप्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये, सुरण प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलोप्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलोप्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलोप्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलोप्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, वालवड प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलोप्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलोप्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलोप्रमाणे ४१०० रुपये ते ४४००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलोप्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये दर (Vegetables Rate in APMC Market) आहेत.
पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते २००० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १००० रुपये ते १४०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ७०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ८०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ४०० रुपये ते ५०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये दर (APMC Market Navi Mumbai ) आहेत.