ETV Bharat / state

Video viral : 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशीच सडकछाप मजनुला दोन तरुणींनी धुतले; व्हिड़िओ व्हायरल - व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी एका मजनूला दोन तरुणींनी मिळून चांगलीच धुलाई केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार कल्याणमध्ये घडला असून छेड काढणाऱ्या एका तरुणांना तरुनींनी चांगलाच चोप दिला आहे. सध्या मजनूला बेदम चोप देण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video viral
Video viral
author img

By

Published : Feb 14, 2023, 9:51 PM IST

मजनुला दोन तरुणींनी धुतले

ठाणे : एकीकडे प्रेमाचा सण समजला जाणाऱ्या व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात असताना दुसरीकडे मात्र, तरुणींची छेड काढणाऱ्या मजनूंची काही कमी नाही. काही तरुणींना त्रास सहन करतात. पण, काही अशा असतात की त्या मजनूला आयुष्यभर अद्दल घडवतात. व्हॅलेंटाईन 'डे'ला काहीतरी तुफानी करायला गेलेल्या अशाच एका मजनूला दोन तरुणींनी मिळून चांगलीच धुलाई केली. हा प्रकार कल्याण नजीक वडवली गावात घडला असून तरुणीची छेड काढणाऱ्या त्या मजनूला बेदम चोप देण्यात आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल : कल्याण - कसारा मार्गावरील आंबिवली रेल्वे स्थानकानजीक वडवली गाव आहे. या गावातील एका तरुणीची छेड काढणाऱ्या त्या मजनूला पीडित मुलीच्या नातेवाईकाने पकडून घरानजीक आणले. त्यानंतर पीडित दोन तरुणींनी नातेवाईकांसमोर बेदम चोप दिला. तरुणीने मजनूला लाथा बुक्क्यांसह झाडूनेही बेदम मारहाण केल्याचे व्हिडओ मधून दिसत येत आहे. पीडित तरुणी त्या मजनूला मारहाण करतानाचा सर्व प्रकार एका मोबाईल कैमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पोलिसांना लक्ष देण्याची विनंती : खडकपाडा पोलीस ठाण्यात या प्रकरणाची कोणतीही नोंद झाली नाही. तसेच पीडित दोन्ही तरुणी वडवली भागात राहणाऱ्या आहेत. मात्र मारहाण झालेल्या मजनू विषयी काही माहिती मिळू शकली नसून तो कोणत्या परिसरातील राहतो याचीही खात्री झाली नाही. दुसरीकडे स्थानीक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या परिसरात मुलींची रोजच छेड काढली जाते, अशा प्रकारची टवाळकी करणारी तरुणांनी या परिसरात उच्छाद मांडलाय अशी तक्रार या ठिकाणच्या नागरिकांनी केली आहे. त्यामुळे मुलींची छेड होण्याच्या घटनेत वाढ होत असल्याने पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिकांमधून जोर धरत आहे.

हेही वाचा - Navneet Rana : 'लिव्ह इन रिलेशनशिप'सह समलैंगिक विवाहावर खासदार नवनीत राणांचे मोठे विधान; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.