ETV Bharat / state

'लसीकरणाचा वेग वाढवा, रुग्णांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज'; डॉक्टरांच्या एकनाथ शिंदेंना सूचना - एकनाथ शिंदे ठाणे न्यूज

महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. त्यापार्श्वभूमीवर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील डॉक्टरांसोबत बैठक घेतली. यावेळी 'लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. रूग्णांंसाठी मानसोपचार तज्ज्ञांची गरज आहे', असे डॉक्टरांनी सूचवले.

thane
ठाणे
author img

By

Published : May 2, 2021, 4:35 PM IST

मुंबई - कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी ठाण्यातील डॉक्टरांसोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेण्याचा विचार सुरू आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्यासोबतच लसीकरणातील अडचणी दूर करण्याची एकनाथ शिंदेंनी ग्वाही दिली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेच्या तुलनेत मृत्यूदर वाढला आहे. तो कमी करण्यासाठी नक्की काय करता येईल, यावर चर्चा करण्यासाठी आज (2 मे) ठाणे पालिकेच्या सभागृहात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एका खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाणे शहरातील कोरोना रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांशी बोलून याबाबत नक्की काय करता येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

'वेळेत ऑक्सिजन मिळावा'

'राज्यात अजूनही ऑक्सिजनचा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत झाल्यास अनेक जीव वाचू शकतील. त्यासोबतच खाजगी रुग्णालयांना वेळेत ऑक्सिजन मिळाला तर ऐनवेळी रुग्णांना हलवण्याची वेळ येणार नाही', असे डॉक्टरांनी यावेळी सांगितले.

'रूग्णांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज'

अनेकदा रुग्ण आयसीयूमध्ये दाखल झाल्यावर मानसिकरित्या खचतात. त्यामुळे ते लवकर दगावतात, असे निरीक्षण काही डॉक्टरांनी नोंदवले. त्यावर उपाय म्हणून या रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची नितांत गरज असल्याची सूचना डॉक्टरांनी मांडली. यावर ठाणे ग्लोबल कोविड सेंटरमध्ये अशी सुविधा उपलब्ध आहे. पण, खाजगी रुग्णालयात अशी सेवा उपलब्ध नाही. तिथे ही सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल, यावर विचार करण्याची सूचना एकनाथ शिंदे यांनी ठाणे पालिका आयुक्तांना केली.

'लसीकरणाचा वेग वाढवा'

'उपचारपद्धतीसोबतच लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. केंद्राला विशेष विनंती करून राज्याला आपली मार्गदर्शक तत्वे तयार करून वेगाने लसीकरण पूर्ण करण्याची परवानगी मिळावी. त्यासोबत तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोना होण्याची भीती अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली. त्यामुळे त्यापूर्वी बहुतांश लोकांचे लसीकरण पूर्ण करून तिसऱ्या लाटेला आळा घालण्यास प्राधान्य द्यावे', असेही या डॉक्टरांनी सुचवले. यावर, 'ही मागणी योग्यच असून आपण मंत्रिमंडळ बैठकीत ती नक्की मांडू', असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.

'दिवसरात्र काम करून रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांना कोरोना झाल्यास त्यांना उत्तम वैद्यकीय सेवा देण्यात कोणतीही कसूर बाकी ठेवली जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत जास्तीत जास्त रुग्ण बरे होतील यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करा', असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.

हेही वाचा - लॉकडाऊनमुळे मुंबईतील मरिन ड्राईव्हवर शुकशुकाट

हेही वाचा - येवला शहरात विना मास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.