ETV Bharat / state

Crematoriums Story: केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील 40 गावात स्मशानभूमीच नाही, भर पावासात होतात अंत्यसंस्कार - केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपील पाटील

एकीकडे देशभरात 'आझादी का 75 वा अमृत महोत्सव' साजरा करत केला जात आहे. पण दुसरीकडे देशातील अनेक गावात पुरेसा सोयी-सुविधा नाहीत. स्वातंत्र्य मिळून आपल्याला 75 वर्ष जरी झाले असले तरी नागरिकांना मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ठाण्यातील मुरबाड तालुक्यामधील 40 गावांमध्ये स्मशानभूमी नाही. विशेष म्हणजे हा मतदारसंघ केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा आहे.

40 गावांमध्ये नाही स्मशानभूमी
40 गावांमध्ये नाही स्मशानभूमी
author img

By

Published : Aug 13, 2023, 11:11 AM IST

Updated : Aug 13, 2023, 10:57 PM IST

प्रतिक्रिया देताना

ठाणे : जिल्ह्यात असलेल्या मुरबाड तालुक्यामधील तब्बल 40 ते 42 गावात स्मशानभूमीच नाही. यामुळे येथील गावकऱ्यांना ऊन्हात आणि मुसळधार पावसात मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. विशेष म्हणजे केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या लोकसभा क्षेत्रातील ही गावे आहेत. मुरबाड तालुक्यात भाजपाचे किसन कथोरे सलग तीनवेळा येथून आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर शिवसेना (शिंदे गटाचे) जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुभाष पवार हे येथील आहेत. असे दिग्गज नेते असूनही आदिवासी गाव-पाड्यातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत.

गावांना नाही रस्ता : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरापासून 72 किलोमीटर अंतरावर मुरबाड तालुका आहे. तरीही या तालुक्यातील हजारो नागरीक अनेक मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. खळबळजनक बाब म्हणजे तालुक्यातील 67 गाव-वाड्या पाड्यांना रस्ते नसल्याने पावसाळ्यात जीव धोक्यात घालून नदी नाले ओलांडून ये-जा करावी लागते. हे झाले पावसाळ्याचे. उन्हाळ्यातही येथील नागरिकांना हाल सहन करावे लागतात. उन्हाळ्यात येथे भीषण पाणीटंचाईदेखील भासत असते.

स्मशानभूमी कागदावरच : या गावांमध्ये स्मशानभूमीची सुविधादेखील नाही. यामुळे गावातील नागरिकांना भरपावसातच मृतदेहांवर अंत्यविधी करावा लागतो. मुरबाड तालुक्यात 126 ग्रामपंचायती असून यातील बहुतेक ग्रामपंचायती या ग्रुप ग्रामपंचायत आहेत. या ग्रुप ग्रामपंचायतींमध्ये अनेक आदीवासी वाड्या, पाड्याचा समावेश आहे. त्यामुळे अनेक ग्रुप ग्रामपंचायतींमधील स्मशानभूमी या सरकारी कागदावरच उभारल्या गेल्या आहेत. यामुळे गावकऱ्यांना एकदा मृतदेहावर अंत्यसंस्कार नदी-नाल्याच्या शेजारी उघड्यावरच करावे लागतात.

मागणी दखल कोणी घेईना : मुरबाड तालुक्यातील अनेक ग्राम पंचायतींमध्ये स्मशानभूमींचा प्रश्न गंभीर आहे. काही ठिकाणी जागेची अडचण आहे. तर काही ठिकाणी निधींची कमतरता असल्याने स्मशानभूमी गावकऱ्यांना मिळत नाही. परंतु या गंभीर समस्येची लोकप्रतिनिधीसह प्रशासनही दखल घेत नाही. त्यामुळे गावकऱ्यांच्या मूलभूत समस्या सोडवणार कोण? असा सवाल गावकरी करत आहेत. तालुक्यातील डोंगरपायथ्याशी असणाऱ्या न्याहाडी ग्रामपंचायत, बळेगाव उमरोलीचे (सातपाडे ) सोनावळे ,सोनगाव, पळू, गावात स्मशानभूमी नसल्याने पळूगावातील संतोष मोरे यांनी तर स्मशानभूभीतच गेल्या वर्षी उपोषण केले होते. तरीही गावकऱ्यांना मृतदेहांवर भर पावसात अंत्यसंस्कार करावे लागले.

पावसात करतात अंत्यसंस्कार : काही ठिकाणी तुडुंब भरलेल्या नाल्यातून अंत्ययात्रा काढली जात आहे. तर काही ठिकाणी भर पावसात अग्निदाह दिला जात आहे. पावसाळ्यात मृतदेहाला अग्निदाह देताना नाईकवाईकांना ताडपत्री आणि प्लास्टिकच्या कागदाचा आडोसा करावा लागतो. न्याहाडी, ग्रामपंचायतीमध्ये पायरवाडी, वैतागवाडी, न्याहाडीपाडा, अशी ग्रामपंचायत अस्तित्वात असून जवळ-जवळ एक हजाराच्या आसपास येथील लोकसंख्या आहे. तरीही येथे स्मशानभूमी नाही. तालुक्यातील अनेक गावात हीच परिस्थिती असल्याचे गावकरी सांगत आहेत. दरम्यान तालुक्यात विकासकामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असल्याचे चित्र रंगवले जाते. विकासकामे केल्याच्या गप्पा नेतेमंडळी मोठ्याने मारत असतात. परंतु इकडे तालुक्यातील 40 ते 42 गावात स्मशानभूमीचा पत्ता नाही. त्यामुळे येथील गावकऱ्यांना मृत्यूनंतरही मरण यातना सहन कराव्या लागत आहेत.

नागरिकांच्या प्रतिक्रिया : याप्रकरणी अधिकची घेण्यासाठी मुरबाडचे तहसीलदार संदीप आवारी यांना पत्रकार प्रतिनिधींनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

गेल्या अनेक वर्षापासून पळू गावासह आसपासच्या 6 ते 7गाव-पाड्यात स्मशानभूमी नाही. यामुळे आम्हाला उघड्यावर मृतदेहांवर अंत्यविधी करावा लागतो. त्यामुळे गेल्या वर्षी पळूगावातील उघड्या स्मशानच्या जागेच बसून उपोषण केले होते.त्यानंतर स्थानिक प्रसाशन आणि लोकप्रतिनिधींनी लवकरच स्मशानच्या जागेच शेड बांधून विविध सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले. मात्र अद्याप परिस्थिती जैसे थे, अशीच आहे. - पळूगाव येथील रहिवाशी संतोष मोरे

आमच्या गावात रस्ताच नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात मृत व्यक्तीची अंत्ययात्रा नदी- ओढ्याच्या प्रवाहातून स्मशानपर्यत घेऊन जावी लागते. नदी-ओढ्यावर पूल उभारण्यात यावा, याची मागणी आम्ही 2016 पासून करत आहोत. मात्र अद्यापही या मागणीकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही.- लोखंडेवाडीत राहणारे धनाजी वाघ

हेही वाचा-

  1. Special Story : टाकाऊ वस्तूंपासून बनवले 'थ्री इन वन' इंडिकेटर, खर्च केवळ 70 रुपये!, वाचा स्पेशल स्टोरी
  2. Free 3D Technology Camp: आता डॉक्टरांना देखील घेता येणार मोफत 3D तंत्रज्ञानाचा फायदा! वाचा स्पेशल स्टोरी..

Last Updated : Aug 13, 2023, 10:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.