ठाणे - उल्हासनगर महापालिका अतिक्रमण विभागाने उल्हासनगर रेल्वे स्थानकासमोरील रस्त्याचे रूंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. या रस्ता रूंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या 21 दुकानांचे वाढीव बांधकाम महापालिकेने पाडले आहे.
हेही वाचा - ठाण्यातील म्हसा यात्रेला 350 वर्षांची परंपरा; मात्र, यंदा अवकाळी पावसाचा परिणाम
उल्हासनगर महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशानुसार प्रभाग समिती 2 चे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी आपल्या पथकासह सोमवारी दुपारच्या सुमारास पोलिसांच्या मोठ्या बंदोबस्तात उल्हासनगर पूर्वेकडील रेल्व स्थानकासमोरील रस्ता रूंदीकरणात बाधीत होणाऱ्या २१ दुकानांच्या वाढीव बांधकामांवर जेसीबीच्या सहाय्याने कारवाई केली. त्यामुळे दुकानदारांमध्ये एकच खळबळ उडाली.
हेही वाचा - ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांकडून १५ वाहनांची तोडफोड
रस्त्याचे रूंदीकरण होणार असल्याने पालिकेने ही धडक कारवाई केल्याची माहिती प्रभाग अधिकाऱ्याने दिली आहे. मात्र, महापालिकेच्या या धडक कारवाईमुळे दुकानाचे वाढीव बांधकाम केलेल्या दुकानधारकांचे धाबे दणाणले आहेत.