ठाणे : गेल्या काही काळात ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील बदलापूर, अंबरनाथ परिसरात पडलेल्या पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली (Ulhas River Crossed The Danger level) आहे. त्यामुळे बदलापूर, अंबरनाथ तालुक्यातील नदी परिसरात तसेच उल्हास नगर व कल्याण तालुक्यातील नदीच्या परिसरात पाणी भरण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे नदी काठाच्या व परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून दिला आहे.
उल्हास नदी पाणी पातळी - नदीवरील बदलापूर (Badlapur barrage) बॅरेजमधील पाणी पातळीची इशारा पातळी 16.50 मीटर इतकी असून, आज दुपारी 1 वाजेपर्यंत पाणी पातळी इशारा पातळीच्या वर 17.20 मीटर इतकी झाली आहे. जांभूळ बंधारा येथील नदीची इशारा पातळी 13 मीटर असून, सध्या येथे धोका पातळीच्या वर 14.57 मीटर इतकी पाणी पातळी आहे. कल्याण तालुक्यातील मोहने बंधारा (Mohne Bandhara Kalyan)
हेही वाचा : Ulhas River : उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ; काठेला असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा येथे नदीची इशारा पातळी 9 मीटर असून, सध्या येथे 9.33 मीटर इतकी पाणी पातळी आहे.