ETV Bharat / state

आचारसंहितेच्या आधी ठाण्यात उद्घाटनांचा धडाका, उद्धव ठाकरे राहणार उपस्थित - multi specialty hospital

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारी ठाण्यात येणार आहेत. ठाणे महापालिका व जितो शैक्षणिक व वैद्यकीय ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नांतून उभ्या राहिलेल्या श्री महावीर जैन रुग्णालय व प्रताप आशर कार्डिअॅक सेंटरचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

आचारसंहितेच्या आधी ठाण्यात उदघाटनांचा धडाका
author img

By

Published : Sep 10, 2019, 11:24 PM IST

ठाणे - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारी ठाण्यात येणार आहे. ठाणे महापालिका व जितो शैक्षणिक व वैद्यकीय ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नांतून उभ्या राहिलेल्या श्री महावीर जैन रुग्णालय व प्रताप आशर कार्डिअॅक सेंटरचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच ठाणे शहरातील मध्यवर्ती लुईस वाडी येथे ठाणेकरांसाठी नवी आरोग्य सुविधा, ठाणे महापालिका व जितो ट्रस्ट संचालित उथळसर येथील नव्या अद्यावत शाळेचेही भूमिपूजन होणार आहे. कर्करुग्णांसाठी ओवळा येथे टाटा मेमोरिअल हॉस्पिटल उभारण्यासंदर्भात सामंजस्य करार, जवाहरबाग येथील नूतनीकरण केलेल्या स्मशानभूमीचे लोकार्पण देखील करण्यात येणार आहे.

आचारसंहितेच्या आधी ठाण्यात उदघाटनांचा धडाका

ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या ८३ वर्षे जुन्या इमारतीचा पुनर्विकास करून तिथे अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली आहे. या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या संकल्पचित्राचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तसेच सिटी स्कॅन व डिजिटल एक्सरे सुविधांचे लोकार्पणही होणार आहे. मूळ ३३६ खाटा असलेल्या या जिल्हा रुग्णालयाच्या जागी आता ५७४ खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय होत असून त्यापैकी १४० खाटा हृदयरोग, मेंदुविकार, कर्करोग, मूत्ररोग आदी विकारांच्या संदर्भ सेवांसाठी असणार आहेत.

पहिल्या टप्प्यात जिल्हा रुग्णालयाच्या २ सात मजली इमारती बांधल्या जाणार आहेत. एका इमारतीत अद्यावत यंत्रसामुग्रीसह सुसज्ज जिल्हा रुग्णालय, तर दुसऱ्या इमारतीत संदर्भ सेवा रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयातील विविध तपासणी विभाग कार्यरत असतील. तिसऱ्या इमारतीत विविध प्रशासकीय विभाग, परिचारिका प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, बहुउद्देशीय प्रशस्त सभागृह यांसह विविध रुग्णालयीन विभागाच्या प्रशासकीय कामकाजाची दालने व निवासस्थाने प्रस्तावित आहेत. तसेच, सुसज्ज नेत्ररोग विभाग तयार करण्यात येणार असून यात अद्यावत तंत्रज्ञानाने युक्त शस्त्रक्रिया गृह, लेसर उपचार पद्धती, रेटिना उपचार पद्धती आदी आधुनिक उपचारांचा समावेश आहे. अत्याधुनिक रक्तपेढी, आधुनिक शस्त्रक्रिया गृह, ऑटोक्लेव्ह रूम, डायलिसिस विभाग, रुग्णांच्या नातलगांसाठी निवासाची सोय, सर्व इमारतींसाठी सौर व्यवस्था, सेंट्रल ऑक्सिजन व सक्शन सिस्टिम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, १०० शव ठेवण्याची सोय असलेले शवागृह आदी सुविधा या नव्या रुग्णालयात असणार आहेत.

मेंदुविकार व मेंदु शल्यचिकित्सा विभागामुळे अपघातग्रस्त रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकार आणि कर्करोगांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढत असून या दोन्ही आजारांवरील उपचारांची सोय या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. यामुळे गोरगरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.

Intro:आचारसंहितेच्या आधी ठाण्यात उदघाटनांचा धडाका उद्धव ठाकरे येणार ठाण्यातBody: उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ठाण्यात येणार आहे .ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या ८३ वर्षे जुन्या इमारतीचा पुनर्विकास करून तिथे अत्याधुनिक सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली असून या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या संकल्पचित्राचे अनावरण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे . तसेच सिटी स्कॅन व डिजिटल एक्स रे सुविधांचे लोकार्पणही होणार आहे . मूळ ३३६ खाटांचे असलेल्या या जिल्हा रुग्णालयाच्या जागी आता ५७४ खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय होत असून त्यापैकी १४० खाटा या हृदयरोग, मेंदुविकार, कर्करोग, मूत्ररोग आदी विकारांच्या संदर्भ सेवांसाठी असणार आहेत.
पहिल्या टप्प्यात जिल्हा रुग्णालयाच्या दोन सात मजली इमारती बांधल्या जाणार आहेत. एका इमारतीत अद्ययावत यंत्रसामुग्रीसह सुसज्ज जिल्हा रुग्णालय, तर दुसऱ्या इमारतीत संदर्भ सेवा रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयातील विविध तपासणी विभाग कार्यरत असतील.
तिसऱ्या इमारतीत विविध प्रशासकीय विभाग, परिचर्या प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, रुग्णालयीन प्रशिक्षण केंद्र, बहुउद्देशीय प्रशस्त सभागृह यांसह विविध रुग्णालयीन विभागाच्या प्रशासकीय कामकाजाची दालने व निवासस्थाने प्रस्तावित आहेत. तसेच, सुसज्ज नेत्ररोग विभाग तयार करण्यात येणार असून यात अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त शस्त्रक्रिया गृह, लेसर उपचार पद्धती, रेटिना उपचार पद्धती आदी आधुनिक उपचारांचा समावेश आहे. अत्याधुनिक रक्तपेढी, अद्ययावत शस्त्रक्रिया गृह, ऑटोक्लेव्ह रूम, डायलिसिस विभाग, रुग्णांच्या नातलगांसाठी निवासाची सोय, सर्व इमारतींसाठी सौर व्यवस्था, सेंट्रल ऑक्सिजन व सक्शन सिस्टिम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, १०० शव ठेवण्याची सोय असलेले शवागृह आदी सुविधा या नव्या रुग्णालयात असणार आहेत.
मेंदुविकार व मेंदु शल्यचिकित्सा विभागामुळे रस्ते अपघातात डोक्याला मार बसलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करणे शक्य होणार असून त्यामुळे या अपघातग्रस्तांचे जीव वाचवता येणार आहेत. सद्यस्थितीत ही सुविधा नसल्यामुळे अशा अपघातग्रस्तांना मुंबईला पाठवावे लागते, मात्र प्रवासात वेळ वाया जात असल्यामुळे तातडीने उपचार न मिळून अपघातग्रस्त दगावण्याचे प्रमाण मोठे आहे.
बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयविकार आणि कर्करोगांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढत असून या दोन्ही आजारांवरील उपचारांची सोय या ठिकाणी होत असल्यामुळे गोरगरीब रुग्णांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे.ठाणे महापालिका व जितो शैक्षणिक व वैद्यकीय ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नांतून उभ्या राहिलेल्या श्री महावीर जैन रुग्णालय व प्रताप आशर कार्डिअॅक सेंटरचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ठाणे शहरातील मध्यवर्ती लुईस वाडी येथे ठाणेकरांसाठी नवी आरोग्य सुविधा , ठाणे महापालिका व जितो ट्रस्ट संचालित उथळसर येथील नव्या अद्ययावत शाळेचेही भूमिपूजन , कर्करुग्णांसाठी ओवळा येथे टाटा मेमोरिअल हॉस्पिटल उभारण्यासंदर्भात सामंजस्य करार , जवाहबाग येथील नूतनीकरण केलेल्या स्मशानभूमीचे लोकार्पण

byte:- एकनाथ शिंदे ( पालकमंत्री, ठाणे जिल्हा )

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.