ETV Bharat / state

भिवंडीत दोन 'दारुवाल्या आंटींना' अटक; घरातील गावठी दारूसह हातभट्टी केली नष्ट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर ठाण्यात गेल्या १० दिवसापासून विविध गुन्हेगारांसह सर्वच प्रकारच्या गोरखधंद्याना आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच भिवंडीत लाखोंच्या संख्येने कामगार वर्ग राहत असल्याने दारू माफिया कामगार वस्त्यांमध्ये गावठी दारूची विक्री करत असल्याचे यापूर्वीही अनकेवेळा उघड झाले आहे.

आंटीच्या घरी पोलिसांनी धाड टाकली
author img

By

Published : Sep 28, 2019, 9:13 PM IST

ठाणे - भिवंडीतील टेमघर परिसरात गावठी दारू विक्री करणाऱ्या कुख्यात आंटीच्या घरी पोलिसांनी धाड टाकली. तेव्हा घरातच गावठी दारूची भट्टी बघून पोलिसही थक्क झाले. यांनतर पोलिसांनी घरातील गावठी दारूसह हातभट्टी उद्ध्वस्त करून काही मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन महिलांवर शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.

नंदाबाई फुलोरे (वय, ४५) व सखुबाई चौधरी (वय, ४५) असे बेकायदेशीर गावठी दारू घरातच तयार करून विक्री करताना आढळून आलेल्या महिलांची नावे आहेत. विशेष म्हणजे टेमघर परिसरात या दोघीही 'दारुवाली आंटी'च्या नावाने ओळखल्या जातात.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर भिवंडी पोलीस परिमंडळ २ चे पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदशनाखाली भिवंडी क्षेत्रातील ६ पोलीस ठाण्यात गेल्या १० दिवसांपासून विविध गुन्हेगारांसह सर्वच प्रकारच्या गोरखधंद्याना आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच भिवंडीत लाखोंच्या संख्येने कामगार वर्ग राहत असल्याने दारू माफिया कामगार वस्त्यांमध्ये गावठी दारूची विक्री करत असल्याचे यापूर्वीही अनकेवेळा उघड झाले आहे.

हेही वाचा - उल्हासनगरमधील 'साई कुटीर' इमारतीचा काही भाग कोसळला; ढिगाऱ्याखाली अनेक वाहनांचं नुकसान

गावठी दारूच्या विक्रीवर अंकुश आणण्यासाठी शांतीनगर पोलिसांनी आपल्या हद्दीत खबऱ्याचे जाळे पसरून माहिती घेतली असता, टेमघर गावात नंदाबाई (आंटी) ही महिला घरातच हातभट्टीची गावठी दारू तयार करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गुरुवारी रात्रीच्या सुमाराला वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसूजा, पोलीस निरीक्षक कबडी, यांनी पोलीस पथकासह आंटीच्या घरावर धाड टाकली. त्यावेळी घरातच हातभट्टीची दारू तयार होत असल्याचे पोलीस पथकाला निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी दारूची भट्टी उद्ध्वस्त करत ५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नंदाबाईला ताब्यात घेऊन अटक केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. आर. चाळके करत आहे.

हेही वाचा - लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला ७ वर्षांची सक्तमजुरी

याचवेळी टेमघर परिसरताच सखुबाई चौधरी ही महिलाही तिच्या राहत्या घराच्या समोरच गावठी दारू विक्री करताना आढळून आली. तिलाही अटक करून तिच्या ताब्यात असलेल्या २० लिटर गावठी दारूचा कॅन जप्त केला. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. आर. शेळके करत आहेत. दरम्यान, पोलिसांच्या अटकेत असलेल्या या दोन्ही महिला आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली.

हेही वाचा - अबब! चोरट्यांनी पळवले ठाणे महापालिकेच्या पाण्याचे विद्युत मीटर

Intro:kit 319Body:' जवा रात्री त्या आंटीची पोलिसांनी वाजवली घंटी, तवा घरातच आढळली दारूची भट्टी '

ठाणे :- महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक मिलींद शिंदे यांनी गायलेल्या ‘जवा रात्री या आंटीची जवा घंटी मी वाजवली’ या लोकगीता सारखीच घटना भिवंडीत समोर आली आहे.
भिवंडीतील टेमघर परिसरात गावठी दारू विक्री करणाऱ्या कुख्यात आंटीच्या घराची पोलिसांनी घंटी वाजवून धाड टाकली. तवा घरातच गावठी दारूची भट्टी बघून पोलिसही ही थक्क झाले. यांनतर पोलिसांनी घरातील गावठी दारूसह हातभट्टी उधवस्त करून काही मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन्ही महिलांवर शांतीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली. नंदाबाई फुलोरे (वय, ४५) व सखुबाई चौधरी (वय, ४५) असे बेकायदेशीर गावठी दारू घरातच तयार करून विक्री करताना आढळून आलेल्या महिलांची नावे आहे. विशेष म्हणजे टेमघर परिसरात या दोघीही दारुवाली आंटीच्या नावाने ओळखल्या जातात.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्ववभूमीवर भिवंडी पोलीस परिमंडळ २चे पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदशनाखाली भिवंडी क्षेत्रातील ६ पोलीस ठाण्यात गेल्या १० दिवसापासून विविध गुन्हेगारांसह सर्वच प्रकारच्या गोरखधंद्याना आळा घालण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचाच भिवंडीत लाखोंच्या संख्येने कामगार वर्ग राहत असल्याने दारू माफियांनी ठिकठिकणांच्या कामगार वस्त्यांमध्ये गावठी दारूची विक्री करीत असल्याचे यापूर्वीही अनकेवेळा पोलिसांनी केलेल्या छापेमारीवरून उघड झाले आहे. त्यामुळे गावठी दारूच्या विक्रीवर अंकुश आणण्यासाठी शांतीनगर पोलिसांनी आपल्या हद्दीत खबऱ्याचे जाळे पसरून माहिती घेतली असता. एका गुप्त बातमीदारामार्फत टेमघर गावात नंदाबाई (आंटी) हि महिला घरातच हातभट्टीची गावठी दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे गुरुवारी रात्रीच्या सुमाराला वरिष्ठ पोलीस निरीक्षक ममता डिसूजा, पोलीस निरीक्षक कबडी, यांनी पोलीस पथकासह आंटीच्या घरावर धाड टाकली. त्यावेळी घरातच हातभट्टीची दारू तयार होत असल्याचे पोलीस पथकाला निदर्शनास आल्याने पोलिसांनी दारूची भट्टी उध्दवस्त करीत ५ हजार १०० रुपयांचा मद्देमाल जप्त करून नंदाबाईला ताब्यात घेऊन अटक केली. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. आर. चाळके करीत आहे.
याचवेळी टेमघर परिसरताच सखुबाई चौधरी हि महिलाही तिच्या राहत्या घराच्या समोरच गावठी दारू विक्री करताना आढळून आल्याने तिलाही अटक करून तिच्या ताब्यात असलेल्या २० लिटर गावठी दारूचा केन जप्त केला. या घटनेचा अधिक तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक बी. आर. शेळके करीत आहेत. दरम्यान, पोलिसांच्या अटकेत असलेल्या या दोन्ही महिला आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्यात देण्यात आली .

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.