ETV Bharat / state

Bhiwandi Burglary : एकाच रात्री १२ घरफोड्या करणारे 'ते' दोन्ही चोरटे अखेर गजाआड - भिवंडी घरफोडी अपडेट

एकाच रात्रीत तब्बल १२ घरफोड्याकरून पसार झालेल्या चोरट्यांना ( Two Thieves Arrest By Kongaon Police ) कोनगाव पोलिसांनी अटक केली होती. त्यांना नौपाडा पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. रवी उर्फ गानू तानाजी धनगर (१९) रा. आंबिवली, कल्याण आणि राज विजय राजापूरे (२१) रा. इंदोर मध्यप्रदेश, अशी घरफोडी प्रकरणी अटक केलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत.

Bhiwandi Thieves Arrest
Bhiwandi Thieves Arrest
author img

By

Published : Jan 15, 2022, 8:41 PM IST

ठाणे - एकाच रात्रीत तब्बल १२ घरफोड्याकरून पसार झालेल्या चोरट्यांना ( Two Thieves Arrest By Kongaon Police ) कोनगाव पोलिसांनी अटक केली होती. त्यांना नौपाडा पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. रवी उर्फ गानू तानाजी धनगर (१९) रा. आंबिवली, कल्याण आणि राज विजय राजापूरे (२१) रा. इंदोर मध्यप्रदेश, अशी घरफोडी प्रकरणी अटक केलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत.

सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते चोरटे -

कल्याण-भिवंडी मार्गावरील कोन नाक्यावर व गावातील दुकानांना चोरट्यांनी लक्ष करीत १५ डिसेंबर रोजी एकाच रात्री डझनभर दुकानांचे शटर कशाने तरी उचकटून आत प्रवेश करत दुकानांतील गल्ल्यात असलेली रोकड आणि काही महागडे साहित्य लंपास केले. यामध्ये ५ मेडिकल, २ स्वीट मार्ट (मिठाईची दुकाने ) आणि २ इतर दुकानाचा समावेश आहे. तर तीन दुकानांचे शटर चोरटे उचकट असताना आवाज झाल्याने चोरट्यांनी पळ काढला होता. घटनेच्या दिवशी अर्घ्यातासाने पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत त्या चोरट्यांचा शोध सुरु केला होता. खळबळजनक बाब म्हणजे १५ डिसेंबरच्या पहाटे कोनगावात दुकाने फोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे १६ डिसेंबरला ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ६ ते ७ दुकाने एकाच रात्री या चोरट्यांनी फोडली होती.

चोरीच्या मोबाईलमध्ये सिमकार्ड टाकले, अन.. -

ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकाने फोडून मुद्देमाल लंपास केला होता. त्यामध्ये एक मोबाईल विक्रीचे दुकान होते. याच दुकानात चोरलेल्या मोबाईलमध्ये चोरट्यांनी सिमकार्ड टाकले आणि त्यांचा ठावठिकाणा लागला. त्यानंतर नौपाडा पोलिसांनी मोबाईल लोकेशनहून इंदोरमधून या दोघांना अटक केली. नौपाडा पोलिसांच्या कोठडीत असताना या चोरट्यांनी कोनगावमध्येही दुकाने फोडून रोकड लंपास केल्याचे कबूल केले. त्यानंतर तीन दिवसापूर्वीच नौपाडा पोलिसांच्या कोठडीत असलेले हे दोन्ही चोरटे कोनगाव पोलिसांनी नौपाडा पोलिसांच्या ताब्यातून घेऊन अटक केली. या चोरट्यांना न्यायालयात हजर केले असता १७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती कोनगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे यांनी शनिवारी दिली आहे.

हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत रुग्णसंख्येत घट; शनिवारी १०६६१ नवे रुग्ण तर ११ जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.