ETV Bharat / state

'ठाण्यातील 'त्या' दोघांचा तबलिगी जमातशी संबंध नाही' - ठाणे तबलिगी जमात

दिल्लीतील मरकझ येथे गेलेल्या दोघांना आयबीच्या अहवालावरून क्वारंटाईन करण्यात आले असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. त्यावर नजीब मुल्ला यांनी सदर वृत्ताचे खंडण केले आहे.

author img

By

Published : Apr 4, 2020, 6:33 PM IST

ठाणे - राबोडीमध्ये तबलिगी जमातचे सदस्य असल्याच्या संशयावरून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन क्वारंटाईन केले आहे. मात्र, या दोघांचा तबलिगी जमातशी काहीही संबध नसून त्यातील एक तर सुन्नी जमातीचा असल्याचा दावा स्थानिक नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी केला आहे.

दिल्लीतील मरकझ येथे गेलेल्या दोघांना आयबीच्या अहवालावरुन क्वारंटाईन करण्यात आले असल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. त्यावर नजीब मुल्ला यांनी सदर वृत्ताचे खंडण केले आहे. या दोघांचा मरकझशी कोणत्याही प्रकारचा संबध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

'ठाण्यातील 'त्या' दोघांचा तबलिगी जमातशी संबध नाही'

राबोडीच्या कामगार नगरमध्ये राहणारा एक भंगार व्यावसायिक आपल्या भावाच्या उपचारासाठी मुझ्झफ्फरपूरला गेला होता. तेथे जाण्यापूर्वी तो निझामुद्दीन स्टेशनला उतरला होता. तर, दुसरा एक जण मुझ्झफ्फरपूर येथे एका दर्गाहला गेला होता. या दोघांचाही मरकझशी कोणत्याही प्रकारचा संबध नाही. मात्र, हे दोघे केवळ निझ्झामुद्दीनला उतरले असल्याचा धागा पकडून अशा बातम्या पसरविल्या जात आहेत. यावर कोणीही विश्वास ठेऊ नये. हे दोघेही तबलिगी जमातशी संबधित नसून ते सामान्य नागरिक आहेत, असेही मुल्ला यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.