ETV Bharat / state

बदलापूर धरणामध्ये बुडालेल्या तिघांपैकी दोघांचे मृतदेह सापडले, एकाचा शोध सुरू

होळी दिवशी गुरुवारी सायंकाळी बदलापूर बॅरेज धरणामध्ये ३ तरुण पोहायला गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते धरणात बुडाले. या ३ तरुणांपैकी दोघांचे मृतदेह आज सापडले असून एकाचा शोध सुरू आहे.

मृत तरुण
author img

By

Published : Mar 22, 2019, 11:51 PM IST

ठाणे - बदलापूर बॅरेज धरणामध्ये बुडालेल्या ३ तरुणांपैकी दोघांचे मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढण्यात अग्निशामकदलाला यश आले आहे. तर एका तरुणाचा अद्यापही शोध सुरू आहे.

बदलापूर बॅरेज धरण

बदलापूरच्या कात्रप भागातराहणारे कल्पेश चौधरी, कार्तिक लाडी आणि उल्हासनगरचे नितीन गाडेकर हे तिघे मित्रांसोबत होळी खेळून गुरुवारी सायंकाळी बदलापूर बॅरेज धरणामध्ये अंघोळीला गेले होते. पाण्यात उतरल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले, अशी माहिती त्यांच्यासोबत असलेल्या इतर मित्रांनी दिली.

घटनेनंतर याची माहिती बदलापूर अग्निशामकदलाला आणि पोलिसांना देण्यात आली. यानंतर अग्निशामकदलाने रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेतला. मात्र, या तरुणांचा पत्ता लागला नाही. आज सकाळी पुन्हा या तरुणांचा शोध घेतल्यावर कल्पेश आणि नितीनचा मृतदेह अग्निशामक दलाने नदी पात्रातून बाहेर काढला. मात्र, अद्यापही कार्तिकचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे दरवर्षी होळी सणात येथे अनेकांचा मृत्यू झाला आहे. तरी देखील प्रशासनाकडून याठिकाणी प्रवेशबंदी का केली जात नाही, असा सवाल नागरिक करत आहेत.

त्या तिघांची होळी ठरली अखेरची; तीन तरुण बॅरेज डॅममध्ये बुडाले; दोघाचे मृतदेह सापडले एकाचा शोध सुरू

ठाणे :- होळी, धुळवढ खेळून बदलापूर बॅरेज डॅममध्ये अंगोळीसाठी आलेले तीन तरुणाचा पाण्यात बुडल्याची घटना घडली आहे. हि घटना बदलापूरच्या बॅरेज डॅममध्ये  काल सायंकाळी हे तरुण बुडल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान व पोलीस घेत होते. मात्र अंधार पडल्याने शोध कार्य थांबविण्यात आले होते. आज पुन्हा शोध कार्य सुरु केला असता तिघा पैकी दोघाचे मृतदेह नदी पत्रातून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. मात्र एकाचा तरुणाचा अद्यापही शोध सुरु आहे.

बदलापूरच्या कात्रप भागात  राहणारे कल्पेश चौधरी  कार्तिक लाडी, आणि उल्हासनगरचा नितीन गाडेकर हे तिघे मित्रांसोबत होळीचा रंग खेळून बदलापूर बॅरेज डॅममध्ये अंगोळीसाठी गेले होते. पाण्यात अंगोळीसाठी उतरले असतांना हे तिघे  खोल पाण्यात गेले. त्याठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडल्याची माहिती त्यांच्या सोबत असलेल्या इतर मित्रांनी दिली आहे.

दरम्यान हे तरुण बुडल्याची माहिती बदलापूर अग्निशमन दलाला आणि पोलिसांना देण्यात आली होती. अग्निशमन दलाने रात्री उशिरा पर्यंत त्यांचा शोध घेतला मात्र या तरुणांचा पत्ता लागला नाही. सकाळी पुन्हा या तरुणांचा शोध घेतल्यावर कल्पेश आणि नितीनचा मृतदेह अग्निशमन दलाने नदी पत्रातून बाहेर काढला. मात्र अद्यापही कार्तिकचा शोध सुरु आहे. विशेष म्हणजे दरवर्षी होळी सणात इथे अनेकांचा यापूर्वी बुडल्याने मृत्यू झाला. तरी देखील प्रशासनाकडून  याठिकाणी प्रवेशबंदी का केली जात नाही असा सवाल नागरिक करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.