ETV Bharat / state

डोंबिवली ते ठाकुर्ली दरम्यान धावत्या लोकलमधून पडून दोन प्रवाशांचा मृत्यू - प्रवाशाची ओळख

लोकल डब्यातून दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या दोघा प्रवाशांचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटना डोंबिवली ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान घडल्या आहेत. मृत पैकी एका प्रवाशाची ओळख पोलिसांना पटली आहे. मात्र, दुसऱ्या प्रवाशाची ओळख अद्याप पटलेली नसल्याचे सांगण्यात आले.

लोकल रेल्वे
लोकल रेल्वे
author img

By

Published : Jun 4, 2022, 9:09 PM IST

ठाणे - लोकल डब्यातून दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या दोघा प्रवाशांचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. या दोन्ही घटना डोंबिवली ते ठाकुर्ली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान घडल्या आहेत. मृत पैकी एका प्रवाशाची ओळख पोलिसांना पटली आहे. मात्र, दुसऱ्या प्रवाशाची ओळख अद्याप पटलेली नसल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात दोन्ही अपघाताची नोंद करण्यात येऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मनोज शंकर म्हात्रे ( वय 40 वर्षे), असे मृत प्रवाशाचे नाव आहे. तर दुसऱ्या मृत प्रवाशाच्या नातेवाईकांचा शोध डोंबिवली लोहमार्ग पोलीस घेत आहेत.

कल्याणकडून सीएसएमटीकडे चाललेल्या लोकलमधून शुक्रवारी (दि. 3 जून) एक प्रवासी दरवाजाजवळ लोंबकळून प्रवास करत होता. हा प्रवासी प्रवास करताना रुळालगतच्या खांबाना हात लावत होता. अचानक ठाकुर्ली रेल्वे स्थानकानजीकच्या एका रेल्वेच्या खांबाचा जोरदार फटका हाताला बसताच लोंबकळत असलेला तो प्रवासी लोकलमधून खाली पडला, असे लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांनी पोलिसांना माहिती दिली. तर लोहमार्ग पोलिसांना एका महिला प्रवाशाने लोकलमधून पडून एका प्रवाशाच्या मृत्यू झाल्याची माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत प्रवाशाचा मृतदेह ताब्यात घेतला. मात्र, त्याची ओळख अद्यापही पटली नसल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या घटनेत ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ मुंबई दिशेने जाणाऱ्या लोकलमधून पडून मनोज म्हात्रे या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. मनोज यांचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा - कपडा व्यवसायातील भागीदारानेच घातला दोन कोटींचा गंडा; पाच जणांवर गुन्हा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.