ठाणे - भिवंडी शहरातील वऱ्हाळ देवी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अमन आरिफ चौऊस (वय 12) व अमान सरफराज खान (वय 14 )असे पाण्यात बुडवून मृत्यू पावलेल्या मुलांची नावे आहेत. (Two Minors Drown In Varhal lake) या प्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
मित्रांनी काढला घटनास्थळावरून पळ - सध्या उष्णतेचा पारा चाळीशीच्या वर गेला असताना भिवंडी शहरातील पटेल कंपाऊंड अमन आरिफ चौऊस व अमान सरफराज खान हे दोघे आपल्या चार मित्रांसह कामतघर वऱ्हाळ तलाव येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजता फिरत फिरत आले. त्यानंतर अमन आरिफ चौऊस व अमान सरफराज खान असे दोघे पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता ते दोघे खोल पाण्यात बुडू लागताच त्यांच्या सोबत आलेले चार मित्रांनी त्या ठिकाणाहून पळ काढला.
रात्री आठ वाजेपर्यत दोन्ही मृतदेह काढले बाहेर - स्थानिकांनी या घटनेची महिती पोलिसांसह अग्निशामक दलास दिली असता अग्निशामक दालने घटनास्थळी दाखल होत शोध मोहीम सुरू केली आहे. दोन तासांच्या शोधमोहिमेत अमन चौऊस याचा मृतदेह हाती लागला. त्यानंतर सायंकाळी अंधार पडू लागल्याने शोध थांबवित असताना रात्री 8 वाजल्याच्या सुमारास अमन अन्सारी याचा मृतदेह हाती लागला आहे. स्थानिक शहर पोलीस ठाण्यात या बाबत अपघात मृत्यूची नोंद करीत दोन्ही मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदना साठी पाठविण्यात आले आहेत.
हेही वाचा - Imran Khan loses PM : इम्रान खान पंतप्रधान पदावरून पायउतार! अविश्वास ठरावात पराभव