ETV Bharat / state

ठाण्यात शेअर मार्केटद्वारे पैसे दुप्पट करणे पडले महाग; २ लाखांचा गंडा - ठाणे

तक्रारदार व्यक्तीला तुमचे पैसे शेअर बाजारात गुंतवून दामदुप्पट करून देतो, असे सांगणारा फोन आला. त्यांनी या आमिषाला बळी पडत थोडे-थोडे करून जवळपास २ लाख १६ हजार रुपये आरोपींच्या बँक खात्यात जमा केले. मात्र, कालांतराने फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

आरोपी
author img

By

Published : Jul 20, 2019, 8:22 PM IST

ठाणे - शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून रग्गड पैसा कमवण्याचे आमिष एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत शहरातील एका व्यक्तीला तब्बल २ लाख १६ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी मध्यप्रदेशातून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

तक्रारदार व्यक्तीला तुमचे पैसे शेअर बाजारात गुंतवून दामदुप्पट करून देतो, असे सांगणारा फोन आला. त्यांनी या आमिषाला बळी पडत थोडे-थोडे करून जवळपास २ लाख १६ हजार रुपये आरोपींच्या बँक खात्यात जमा केले. मात्र, कालांतराने फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ कळवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीनुसार कळवा पोलिसांनी तांत्रिकरितीने तापस करीत मध्यप्रदेशातून अरविंद चव्हाण आणि ऋषिकेश शर्मा यांना अटक केली.

दोन्ही आरोपी मध्यप्रदेशात एक बनावट कॉल सेंटर चालवत होते. त्याद्वारे नागरिकांना शेअरमार्केटच्या भूलथापा देत त्यांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाले. या दोन्ही आरोपींनी अनेक नागरिकांना जवळपास १ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. दोन्ही आरोपींना २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्याची मुदत आज संपली असून पोलीस पुन्हा एकदा वाढीव पोलीस कोठडी देऊन तपास करणार असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी दिली.

Intro:शेयर मार्केट मध्ये रग्गड नफा देतो सांगत फसवणूक... दोघांना अटकBody:
शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करून रग्गड पैसा कमविण्याचे अमिश एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. तुमचे पैसे शेयर बाजारात गुंतवून दामदुप्पट करून देतो असे सांगणारा फोन फिर्यादी यांना आला व त्यांनी या अमिषाला बळी पडत थोडे थोडे करून जवळपास दोन लाख सोळा हजार रुपये सांगितलेल्या बँक खात्यात जमा केले. परंतु आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतच त्यांनी पोलिसात जाऊन फिर्याद नोंदवली. कळवा पोलिसांच्या डिटेक्शन युनिट ने तांत्रिक आधारे तपास करत मध्य प्रदेशातून अरविंद चव्हाण आणि ऋषिकेश शर्मा यांना अटक केली. अधिक तपासात हे दोघ त्या ठिकाणी एक फेक कॉल सेंटर चालवीत असून नागरिकांना शेयरमार्केट च्या भूलथापा देऊन त्यांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी अशा प्रकारे अनेकांना जवळपास एक कोटींचा गंडा घातल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. दोघांना आरोपीना 20तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती ती आज संपली असून पोलीस पुन्हा एकदा वाढीव पोलीस कोठडी घेऊन तपास करणार असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी दिली.
BYTE -शेखर बागडे -वरिष्ठ पोलिस निरीक्षक,कळवाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.