ठाणे : ठाणे जिल्ह्यातील एका महिलेला ओमानच्या आखाती देशात नोकरीचे आमिष दाखवण्यात आले होते. तिला फसवल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. महिला 43 वर्षांची अविवाहीत आहे. तिला एक मुल आहे. ती ठाण्यात राहत आहे. काही दिवसांपूर्वी ऑनलाइन जॉब पोर्टलवर जाहिरात पाहिती होती. त्यानंतर आरोपींनी तिला नोकरीचे आमीष दाखवले आणि तिची फसवणूक केली.
ऑनलाइन जॉब पोर्टलवर जाहिरात : ही घटना रविवारी उघडकीस आली, सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ऑनलाइन जॉब पोर्टलवर पीडित महिलेने जाहिरात पाहिली आणि अर्ज केला. त्यानंतर आरोपीने तिच्याशी संपर्क साधला. अनेक ऑफर्स त्यावेळी तिला देण्यात आल्या. तेव्हा ती आमिषांना बळी पडली. यातच तिला गेल्यावर्षी ओमानला पाठवण्यात आले. काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संदीप कदम यांनी त्याबाबत सांगितले.
मारहाण करण्यात आली : ओमानला पोहोचल्यावर पीडित महिलेला विमानतळावरून एका बंगल्यात नेण्यात आले. तिथे सेक्स रॅकेट चालवले जात असल्याचे तिला समजले. जेव्हा तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिने ओमानला पाठवणार्या दोन एजंटशी संपर्क केला. तिला टाळाटाळ करण्यात आली. नवी मुंबईमध्ये त्यांचे कार्यालय होते. तिथल्या दोन एजंटांनी तिला पाठवले होते. तिला पाठवण्यासाठी ओमानच्या सहकाऱ्यांकडून त्यांनी 3 लाख रुपये घेतल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर तिने 1.65 लाख रुपयांची व्यवस्था केली आणि नंतर तिला 2022 ऑगस्टमध्ये भारतात येण्याची परवानगी देण्यात आली. भारतात आल्यावर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींना नुकतेच अटक करण्यात आली आहे. या रॅकेटचा अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
घरात सेक्स रॅकेट : दक्षिण मुंबईत एका घरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. यात 26 महिलांची सुखरूप सुटका केली. घरात गुप्त खोली तयार करून त्यात महिलांनी ठेवण्यात येत होते. बुधवारी 22 डिसेंबरला पोलिसांनी कारवाईबाबतची माहीती दिली होती. मुंबई पोलिसांच्या सामाजिक सेवा शाखेने लॅमिंग्टन रोड परिसरातील एका इमारतीमधील घरावर छापा टाकला.
हेही वाचा : Triple Talaq In Thane : खळबळजनक! प्रेयसीसमोरच मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून पत्नीला दिला तलाक