ठाणे - दुचाक्या चोरून त्या दुचाकींना बनावट नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या अल्पवयीन चोरट्यासह त्याच्या साथीदाराला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या चोरट्यांकडून आतापर्यंत पाच दुचाक्या हस्तगत केल्या आहे.
उल्हासनगर शहरात दुचाकी वाहने चोरीस जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. चोरीस गेलेल्या दुचाकी वाहनांची माहिती काढून दुचाकी टोळीचा शोध घेण्याबाबत पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, सहायक पोलीस आयुक्त धुला टेळे यांनी सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने उल्हासनगर पोलीस गुन्हे प्रकटीकरण पथकाला गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, एक अल्पवयीन तरुण चोरीची बजाज कंपनीची पल्सर दुचाकी रस्त्यावर फिरताना दिसत आहे.
या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाने सी ब्लॉक गुरुद्वारा नजीक सापळा रचून आरोपी अरबाज उर्फ अरबु सयाउद्दीन मिया याला अल्पवयीनसह चोरट्यासह अटक केली. दोघा आरोपींकडे सखोल तपास केली असता अय्याशी करण्यासाठी त्यांनी आतापर्यंत पाच दुचाक्या चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्या विरोधात उल्हासगनर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी दोघा चोरट्यांकडून 1 लाख 95 हजार रुपये किंमतीच्या एक बजाज कंपनीची पल्सर, दोन होंन्डा ऍक्टिव्हा, एक होंन्डा कंपनीची सी.बी. हॉर्नट, एक पॅशन प्रो, अशा एकूण ५ दुचाक्या जप्त केल्या आहेत. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
हेही वाचा - धक्कादायक! बियरची बाटली फोडून स्वतःच्याच गळ्यात भोसकून घेत तरुणाची आत्महत्या