ETV Bharat / state

20 व्या मजल्यावरून पडून कासवाचा मृत्यू, मालकाविरोधात गुन्हा दाखल - ठाणे जिल्हा लेटेस्ट न्यूज

बाळकुम परिसरातील इमारतीच्या २० व्या मजल्यावरून पडून कासवाच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याची घटना 1 मे ला घडली होती. दरम्यान या प्रकरणी आता कासवाच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अम्मा केअर फाऊंडेशन प्राणीमित्र वेल्फेअर सोसायटीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

20 व्या मजल्यावरून पडून कासवाचा मृत्यू
20 व्या मजल्यावरून पडून कासवाचा मृत्यू
author img

By

Published : May 12, 2021, 9:11 PM IST

ठाणे - बाळकुम परिसरातील इमारतीच्या २० व्या मजल्यावरून पडून कासवाच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याची घटना 1 मेला घडली होती. दरम्यान या प्रकरणी आता कासवाच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अम्मा केअर फाऊंडेशन प्राणीमित्र वेल्फेअर सोसायटीच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

20 व्या मजल्यावरून पडून कासवाचा मृत्यू झाला होता, तसेच मृत कासवाची विल्हेवाट लावण्याबाबत संबंधित व्यक्तीने कुठलीही दक्षता घेतली नाही, अशी माहिती या प्राणीमित्र संघटनेला सफाई कामगार आणि सुरक्षारक्षकांकडून देण्यात आली होती. या माहितीच्या आधारे संस्थेने कापुरबावडी पोलीस ठाण्यात मालकाविरोधात तक्रार दिली होती.

कासवाच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल

सबंधित मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी या तक्रारीमध्ये करण्यात आली होती. बाळकुम येथील कॉरल बिल्डींग, हायलंड हेंवन या इमारतीच्या 20 व्या मजल्यावरून हे कासवाचे पिल्लू पडल्याचे तक्रारीत म्हटले होते. मिळालेल्या तक्रारीनुसार पोलीस उपनिरीक्षक एम.जी. काळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहाणी केली. संबंधित कासवाचे पिल्लू हे प्रतिक चौरे यांचे असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी चौरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - नैनितालच्या जगप्रसिद्ध कैंची धाममध्ये ढगफुटी, कोरोना निर्बंधामुळे मोठी दुर्घटना टळली

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.