ETV Bharat / state

Triple Talaq in Thane : पत्नीला मोबाईलवर कॉल करून पतीनं दिला तिहेरी तलाक; गुन्हा दाखल - तिहेरी तलाक दिल्याची घटना

Triple Talaq in Thane : मोदी सरकारनं तिहेरी तलाकवर बंदी आणलीय. तरीही, या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीत. नुकतंच ठाण्यात पतीनं पत्नीला मोबाईलवर कॉल करून तिहेरी तलाक दिल्याची घटना घडलीय. त्याबद्दल सविस्तर जाणून घेवू या.

Triple Talaq in Thane
ठाण्यात तिहेरी तलाक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 6, 2023, 8:04 PM IST

ठाणे Triple Talaq in Thane : मुस्लिम महिलांना दिलासा मिळावा, याकरता तिहेरी तलाकवर बंदी आणून मोदी सरकारनं संसदेत कायदा पारित केलाय. तर दुसरीकडे कायदा पारित होऊनही मोबाईलवर पत्नीला कॉल करून पतीला 'तलाक, तलाक, तलाक' असं म्हणत तिहेरी तलाक दिल्याची घटना घडलीय. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात तलाक देणाऱ्या पतीसह पीडितेची नणंद आणि तिच्या पतीवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. मेहताब अन्सारी,महंमद रफी अन्सारी, आणि नणंद आलिया (सर्व रा. पवई , मुंबई) असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. तर कशीश अन्सारी ( वय २३) असं पीडित पत्नीचं नाव आहे.

पीडितेचा मानसिक आणि शारीरिक छळ : पोलीस सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, पीडिता ही भिवंडी शहरात कुटुंबासह राहते. तिचा निकाह आरोपी मेहताब याच्याशी झाला आहे. त्यातच पीडिता पवई येथे सासरी असताना घरगुती किरकोळ कारणावरून १७ जून ते १४ ऑगस्ट या दरम्यान पती हा पीडितेला शिवीगाळ करून मारहाण करत होता. खळबळजनक बाब म्हणजे सासरीच राहत असलेला आरोपी नणंदेचा हा पीडितेला अश्लील नजरेनं पाहून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असं कृत्य करत होता. तर पडितेची नणंदही शिवीगाळ व मारहाण करून पीडितेचा मानसिक आणि शारीरिक छळ करीत होती. यामुळं पतीसह सासरच्या मंडळीला कंटाळून पीडिता माहेरी आली होती. (Triple Talaq by phone call)

मोबाईल कॉलवरच तलाक : दरम्यान १४ ऑगस्ट रोजी पतीनं तिच्या मोबाईल नंबरवर कॉल करून तलाक, तलाक, तलाक, असं तीनवेळा उच्चारून मोबाईल कॉलवरच तलाक दिला. पीडित पत्नीचा मानसिक आणि शारीरीक छळ केल्यानं पती, नणंद तिचा पती या तिघांविरोधात ५ सप्टेंबर २०२३ रोजी भोईवाडा पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४९८ (अ), ३५४, ३२३, ५०४, ३४ सह (मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण ) कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केलाय. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद राठोड करीत आहेत.

मुस्लिम महिलांच्या सुरक्षेसाठी कायदा : यापूर्वीही व्हाट्सअपवर पत्नीस ट्रिपल तलाक दिल्याची घटना भिवंडी शहरात घडली होती. या प्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पती विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे पतीने ट्रिपल तलाक देताना उर्दू, अरेबिक आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये व्हाट्सअपवर लिहून ट्रिपल तलाक दिला होता. केंद्र सरकाराने मुस्लिम महिलांच्या सुरक्षेसाठी तिहेरी तलाक कायदा लागू केलाय. तेव्हापासून एकट्या भिवंडीत व्हाट्सअपवर पत्नीस ट्रिपल तलाक दिल्याच्या आतापर्यंत ७ ते ८ घटना घडल्या आहेत. या घटनेत मात्र मोबाईल कॉल करून तलाक दिल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. यामुळं कायदा लागू करून ही ट्रिपल तलाकच्या घटना थांबत नसल्याचं दिसून येत आहे. (Triple Talaq Case)

हेही वाचा :

  1. Triple Talaq In Thane : खळबळजनक! प्रेयसीसमोरच मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करून पत्नीला दिला तलाक
  2. Triple Talaq On WhatsApp : धक्कादायक! हुंड्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवरवरून दिला तलाक
  3. Triple Talaq to Fat Wife Meerut UP तू आधीपेक्षा लठ्ठ झाली; म्हणून तुला तलाक देतोय, मेरठ येथील धक्कादायक घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.