ठाणे : पुणे पोलीस आयुक्त असताना आपल्या कामाने सर्वांची मने जिंकणाऱ्या आयपीएस अधिकारी अमिताभ गुप्ता यांनी राज्यातील कारागृहे ही सुधारगृहे व्हावीत, यासाठी कारागृह व सुधारसेवा विभागाचे अपर पोलीस महासंचालक, महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यातील कारागृहांमध्ये 50 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या बंद्यांना स्वखर्चाने जाड बेडिंग (अंथरुण), उशी आणण्याची परवानी देण्यात आली आहे.
कारागृहातील समस्या बाबत आढावा बैठक : कारागृह विभागातील अडथळे, समस्या जाणून घेऊन त्या दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक तथा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भात सर्व विभाग प्रमुख, सर्व कारागृह अधीक्षकांना परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या बैठकीला कारागृहाचे सर्व उपमहानिरीक्षक, कारागृह अधीक्षक उपस्थित होते.
परवानगी देण्याच्या प्रस्तावावर चर्चा : राज्यातील कारागृहांमध्ये 50 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे कैदी आहेत. तसेच काही वृद्ध कैदी आजारी आहेत. अशा बाबींचा विचार करून, 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या सर्व दोषींना स्वखर्चाने जाड बेडिंग (बेड) आणि उशी आणण्याची परवानगी देण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. तसेच त्याचा मसुदा मंजूर करण्यात आला.
कारागृहात अंथरून विषय असतो गंभीर : कारागृहात अंथरून हा विषय अतिशय गंभीर असतो. त्यांची स्वच्छता योग्य रीतीने होत नसल्यामुळे अनेक कैद्यांमध्ये त्वचेच्या समस्या निर्माण होत असतात. आता याच बाबीकडे गंभीरतेने लक्ष घालत अमिताभ गुप्ता यांनी लवकरच सर्वच अडचणींकडे सोडवण्यासाठी पाऊल उचलले आहे.
हेही वाचा - Shiv Sena Hearing Updates :निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुप्रिम कोर्टाचा नकार