ETV Bharat / state

ठाण्यात परिवहन सदस्य शमीम खान यांचे स्टिंग ऑपरेशन, कामचुकार कर्मचार्‍यांना दणका - shamim khan sting operation thane

खान यांनी ज्या बसमधून प्रवास केला त्या बसमधील प्रवाशांनी विनंती केल्यानंतरही प्रत्येक थांब्यावर बस थांबविण्यात आली नाही. त्याचबरोबर, बस मुंब्रा रेल्वेस्थानकासमोरून नेण्याऐवजी उड्डाणपुलावरून नेल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. ही बाब शमीम खान यांनी परिवहन व्यवस्थापक किशोर गवस यांना कळवताच त्यांनी बेजबाबदार अधिकारऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

परिवहन सदस्य शमीम खान
परिवहन सदस्य शमीम खान
author img

By

Published : Sep 2, 2020, 4:09 PM IST

ठाणे- गेल्या अनेक दिवसांपासून मुंब्रा-कौसा-शिळ भागात चालविण्यात येणार्‍या टीएमटी बसगाड्यांचे कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात होत्या. त्यामुळे, परिवहन सदस्य शमीम खान यांनी चक्क स्टींग ऑपरेशन करून कामचुकार कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला. मात्र, त्यानंतरही मानवतेच्या दृष्टिकोनातून शमीम खान यांनी, या कर्मचार्‍यांना धडा शिकवावा परंतु, त्यांना निलंबित करू नये, अशा सूचना परिवहन व्यवस्थापकांना करून आपल्यातील सहृदयी माणसाचे दर्शन घडविले आहे.

माहिती देताना परिवहन सदस्य शमीम खान

गेल्या काही दिवसांपासून टीएमटी सेवेबाबत प्रवाशांकडून शमीम खान यांच्याकडे तक्रारी केल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर शमीम खान आपल्या अन्य काही सहकाऱ्यांसह मुंब्रा येथील परिवहनच्या बसमध्ये प्रवासी बनून चढले. त्यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये, प्रवाशांच्या विनंतीनंतरही बस न थांबवणे, बस थांबा असतानाही तेथे न थांबवता इतर मार्गावरून बस नेणे, प्रवाशांनी बिनधास्त विनातिकीट प्रवास करणे, अशा त्रुटी आढळल्या.

खान यांनी ज्या बसमधून प्रवास केला त्या बसमधील प्रवाशांनी विनंती केल्यानंतरही प्रत्येक थांब्यावर बस थांबविण्यात आली नाही. त्याचबरोबर, बस मुंब्रा रेल्वेस्थानकासमोरून नेण्याऐवजी उड्डाणपुलावरून नेल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. त्याचबरोबर एका थांब्यावर चढलेला प्रवासी दुसर्‍या थांब्यावर तिकीट न घेता उतरल्याचे सदस्यांना आढळून आले. ही बाब शमीम खान यांनी परिवहन व्यवस्थापक किशोर गवस यांना कळवताच त्यांनी बेजबाबदार अधिकारऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्वांचीच आर्थिक अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याऐवजी इतर माध्यमातून त्यांना धडा शिकवा, अशी मानवतावादी भूमिका शमीम खान यांनी घेतली.

दरम्यान, शमीम खान यांच्या सूचनेवरून टीएमटीच्या अधिकाऱ्यांनी मुंब्रा-कौसा भागाचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये रेती बंदर ते कौसा दरम्यान ३९ बस थांबे उभारण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.

हेही वाचा- रस्त्याच्या दुर्दशेमुळे कल्याण-डोंबिवलीकरांचे हाल; ८ तासाच्या नोकरीसाठी करावा लागतोय ५ तासांचा प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.