ETV Bharat / state

रुळाची पाहणी करताना लोकलच्या धडकेत रेल्वे अभियंत्याचा मृत्यू - कल्याण-डोंबिवली महापालिका

विमलकुमार राय, असे लोकलच्या धडकेत मृत झालेल्या विभागीय अभियंत्याचे नाव आहे.

रेल्वे अभियंत्यांचा मृत्यू
author img

By

Published : Jul 31, 2019, 10:18 PM IST

ठाणे - रेल्वे रुळाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या रेल्वेच्या विभागीय अभियंत्याचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचून चिखलाचा खच झाल्याची पाहणी करण्यासाठी गेले असताना ही घटना घडली. विमलकुमार राय, असे लोकलच्या धडकेत मृत्यू झालेल्या विभागीय अभियंत्याचे नाव आहे. ही घटना कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान असलेल्या पत्रीपुलानजीक घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळच्या सुमाराला मृत विमल कुमार हे रेल्वे रुळाची पाहणी करत होते. ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास पत्री पुलानजीक पाहणी करत असताना एका लोकलने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाल्याने कर्मचाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

विमल कुमार यांचा मृतदेह कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रूक्‍मीनीबाई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. शवविच्छेदन झाल्यावर त्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करत आहेत.

Intro:किट नंबर 139

Body:रेल्वे रुळाची पाहणी करताना रेल्वे अभियंत्यांचा लोकलच्या धडकेत मृत्यू

ठाणे :- सतत पडणाऱ्या पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रुळावर चिखलाचा खच साचल्याने याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या रेल्वेच्या विभागीय अभियंत्याचा लोकलच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही घटना कल्याण ते ठाकुर्ली दरम्यान असलेल्या पत्रीपुला नजीक घडली आहे. विमलकुमार राय असे लोकलच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या विभागीय अभियंतायाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळच्या सुमाराला मृतक विमल कुमार हे रेल्वे रोडचे पाहणी करीत होते. ते 5:30 मिनिटांच्या सुमारास पत्री पुलानजीक पाहणी करीत असताना एका लोकल ने त्यांना जोरदार धडक दिली या धडकेत ते गंभीर जखमी झाल्याने त्याच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी नजीकच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
विमल कुमार यांचा मृतदेह ल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रूक्‍मीनीबाई रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून शवविच्छेदन झाल्यावर त्यांचा मृत्यू देह त्यांच्या कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आला आहे अधिक तपास कल्याण लोहमार्ग पोलीस करीत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.