ETV Bharat / state

ठाणे : वाहतूक पोलिसांची गांधीगिरी.. नियम पाळणाऱ्याचा गुलाबपुष्प देऊन सत्कार

'सडक सुरक्षा, जीवन रक्षा' ह्या घोषवाक्याप्रमाणे सर्वांनी आपापली वाहने काळजीपूर्वक चालवून स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी व प्रशासनास सुद्धा सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे. परिसरात वाहतुकीचे नियम पाळणाऱ्याचा गुलाबाचे फूल देऊन सत्कार करण्यात येत आहे.

author img

By

Published : Feb 2, 2021, 7:58 PM IST

वाहतूक पोलिसांची गांधीगिरी..
वाहतूक पोलिसांची गांधीगिरी..

मीरा भाईंदर (ठाणे) - मीरा भाईंदर शहरात नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, यासाठी वाहतुक पोलिसांनी गांधीगिरी सुरू केली आहे. भाईंदर, मिरारोड आणि काशीमिरा परिसरात वाहतुकीचे नियम पाळणाऱ्याचा गुलाबाचे फूल देऊन सत्कार करण्यात येत आहे. 'सडक सुरक्षा, जीवन रक्षा' ह्या घोषवाक्याप्रमाणे सर्वांनी आपापली वाहने काळजीपूर्वक चालवून स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी व प्रशासनास सुद्धा सहकार्य करावे असे आवाहन वाहतूक विभागातर्फे करण्यात आले आहे.

वाहतूक पोलिसांची गांधीगिरी..

हेही वाचा - पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये डेटिंग अ‌ॅपवरून 16 तरुणांना गंडा घालणारी तरुणी गजाआड

रस्ता सुरक्षा अभियान सुरुवात

मीरा भाईंदर शहरात ३२ वे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत शहरात जागोजागी जे लोक वाहतूक नियमाचे पालन करून वाहन चालवत आहेत, त्यांना गुलाबाचे फूल देऊन सत्कार करण्यात येत आहे. 'सडक सुरक्षा, जीवन रक्षा' ह्या घोषवाक्याप्रमाणे सर्वांनी आपआपली वाहने काळजीपूर्वक चालवून स्वतःच्या जीवास व प्रशासनास सुद्धा सहकार्य करावे, असे वाहतूक विभागातर्फे आवाहन करण्यात आले आहे. एकंदरीत शहरात २४ ठिकाणी वाहतूक पथके काम करत आहेत. यात मंगेश कड, सहायक पोलीस निरीक्षक, सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार विजय सोंडकर, राजाराम कोळी, तेजा राठोड, पोलीस शिपाई श्रीदेवी राठोड, सुधाकर सकपाळ यांचा समावेश आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

मीरा भाईंदर शहरात नाक्या-नाक्यावर वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. मात्र, अधिक पोलीस बळाची गरज शहरात असल्यामुळे सध्या अतिरिक्त भार पोलीस कर्मचाऱ्यांना सोसावा लागत आहे. शहराची वाढती लोकसंख्या पाहता पोलीस कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होणे गरजेचे आहे. शहरात सध्या ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत विना हेल्मेट, तसेच विना कागदपत्रे वाहन चालकांवर जोरदार कारवाई होत आहे.

हेही वाचा - भंडारा : बावनथडी धरणाच्या कालव्याचे पाणी शेतात गेल्याने शेतीचे नुकसान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.