ETV Bharat / state

ठाण्यात धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास बंदी घातल्याने पर्यटकांचा हिरमोड - मुंबई

शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे सलग सुट्ट्या असल्याने हजारो पर्यटकांनी धबधब्यांच्या ठिकाणी धाव घेतली. मात्र, ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांनी सरसकट सर्वच धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास बंदी घातल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला.

धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास बंदी घातल्याने पर्यटकांचा हिरमोड
author img

By

Published : Jul 14, 2019, 8:12 PM IST

Updated : Jul 14, 2019, 9:32 PM IST

ठाणे - सलग ३ दिवस म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार सुट्या असल्याने हजारो पर्यटकांनी निसर्गाच्या सानिध्यात घालविण्यासाठी धबधब्यांच्या ठिकाणी धाव घेतली. मात्र, ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांनी सरसकट सर्वच धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास बंदी घातल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.

ठाण्यात धबधब्यांच्या ठिकाणी जाण्यास बंदी घातल्याने पर्यटकांचा हिरमोड

ठाण्यातील प्रामुख्याने शहापूर तालुक्यातील कसारा घाटापासून १५ किलोमीटर अतंरावर असलेल्या अशोका धबधबा, माहुली धबधबा याठिकाणी मागील काही वर्षापासून पर्यटकांचे आकर्षण वाढले आहे. त्यामुळे पावसाळ्यात दररोज हजारो पर्यटक याठिकाणी येत असतात.

या दोन्ही धबधब्यांसह जिल्ह्यातील इतर धबधब्यात अनेक दुर्दैवी घटना यापूर्वीही घडले आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील काही अतिउत्साही पर्यटक तर काही मद्यपान करून धबधब्याच्या दरीच्या भागातील पाण्यात पोहण्यासाठी उतरतात. मात्र, त्यावेळी त्यांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने तसेच काही पर्यटक पाय घसरून तर काहींचा तोल जाऊन त्यांना आपला जीव गमवावा लागतो. या पार्श्वभूमीवर जिल्हा व स्थानिक प्रशासनाकडून अनेक उपाययोजना करूनही तसेच धोक्याच्या सूचनेचे फलक लावूनही असे दुर्दैवी प्रकार घडत आहेत.

दरम्यान, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे सलग ३ दिवस सुट्ट्या लागून आले. त्यामुळे भंडारदरा, शिर्डी, नाशिक, वणी, सापुताराकडे जाणारे मुंबई व पुण्यातील भाविक व पर्यटक या निसर्गरम्य वातावरणात असलेल्या धबधब्याकडे आनंद घेण्यासाठी धाव घेतली. मात्र, ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत या धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालून पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे मागील ३ दिवसात लाखो पर्यटकांचा हिरमोड झाल्याने ते परतीच्या वाटेवर जाताना दिसून आले.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:धबधब्यांच्या ठिकाणी बंदी घातल्याने पर्यटकांचा हिरमोड

ठाणे :- सलग तीन दिवस म्हणजे शुक्रवार, शनिवार आणि रविवार सुट्या असल्याने या तीन दिवसांत हजारो पर्यटकांनी निसर्गाच्या सानिध्यात घालविण्यासाठी डोंगर , दऱ्या ,च्या पायथ्याशी असलेल्या असंख्य धबधब्यांच्या ठिकाणी धाव घेतली , मात्र ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांनी सरसकट सर्वच धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांना बंदी घातल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे,

प्रामुख्याने शहापूर तालुक्यातील अशोका धबधबा, माहुली धबधबा या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून पर्यटकांचे आकर्षण वाढल्याने पावसाळ्यात दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी येत असतात, या दोन्ही धबधब्यांसह जिल्ह्यातील इतर धबधब्यात अनेक दुर्दैवी घटना यापूर्वीही घडले आहेत, शहरी आणि ग्रामीण भागातील काही अतिउत्साही पर्यटक तर काही मद्यपान करून करून धबधब्याच्या दरीच्या भागातिल पाण्यात पोहण्यासाठी उतरतात, मात्र त्यावेळी त्यांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने तसेच काही पर्यटक पाय घसरून तर काही तोल जाऊन आपला जीव गमवावा लागला आहे , या पार्श्वभूमीवर जिल्हा व स्थानिक प्रशासना कडून अनेक उपाययोजना करूनही तसेच धोक्याच्या सूचनेचे फलक लावूनही असे दुर्दैवी प्रकार घडत आहेत, यामुळे जिल्ह्यातील सर्वच धबधब्यावर पर्यटकांना 31 जुलै पर्यत जाण्यास जिल्हा प्रशासनाकडून मनाई केली आहे, त्यातच शुक्रवार , शनिवार, रविवार सलग तीन दिवस लागून आलेल्या सुट्या तसेच भंडारदरा, शिर्डी, नाशिक, वणी, सापुतारा, कडे जाणारे मुंबई व पुण्यातील भाविक व पर्यटक शहापूर तालुक्यातील कसारा घाट पासून 15 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात असलेल्या अशोका धबधबा, माहुली धबधब्या कडे पर्यटक आनंद घेण्यासाठी कुटुंबासह तसेच काही जेष्ठ नागरिक , महाविद्यालयीन तरुण तरुणी मोठ्या प्रमाणात येत असतात, मात्र ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांनी खास करून या धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, यामुळे गेल्या तीन दिवसात लाखो पर्यटकांचा हिरमोड झाल्याने ते परतीच्या वाटेवर दिसून आले आहे,

Conclusion:
Last Updated : Jul 14, 2019, 9:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.