ठाणे - भिवंडी शहर परिसरात आज बुधवार (दि. 13 मे) चार नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले असून पाच रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज आढळून आलेल्या चार नव्या रुग्णांमुळे शहरातील एकूण रुग्णांचा आकडा 32वर पोहचला आहे.
भंडारी कम्पाउंड येथील एक 46 वर्षीय महिला व ब्रह्मानंद नगर, कामतघर येथील 17 वर्षीय तरुणी वरळी येथील आल्या होत्या. तिसरा रुग्ण या सलामतपुरा येथील 30 वर्षीय डॉक्टर महिला असून त्या सायनच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या सहवासात आल्या होत्या. तर चौथा रुग्ण कुंभार आळी, भिवंडी येथे कमाठीपुरा मुंबई येथून आपल्या आईबरोबर आलेली दोन वर्षीय मुलगी आहे. अशाप्रकारे भिवंडी शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 32 झाली आहे. आजपर्यंत भिवंडी शहरात एका रुग्णाचा मृत्यू झाला असून 9 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या 22 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
ग्रामीण भागातील रुग्णांचा एकूण आकडा 29 असून ग्रामीण भागातील 9 रुग्ण बरे झाले आहेत. तर 20 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. भिवंडी शहर व ग्रामीण भागातील एकूण बाधीत रुग्णांचा आकडा 61 वर पोहचला असून त्यापैकी 18 जण बरे झाले आहेत तर एकाच मृत्यू झाला असून भिवंडी शहर व ग्रामीण भागात सध्या 42 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
हेही वाचा - जंतुनाशक फवारणी करणाऱ्या कर्माचाऱ्यांना 3 महिन्यांपासून पगार नाही, कर्मचाऱ्यांचे आंदोलन