ETV Bharat / state

Burning Bus In Thane टीएमटी बसला डेपोमध्ये आग: आगीमध्ये बस जळून खाक, डिझेल टँक न फुटल्याने अनर्थ टळला

ठाणे परिवहन विभागाची बसने डेपोमध्ये ( TMT bus Set blaze ) आल्यानंतर पेट घेतला. त्यामुळे डेपोच्या परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. ही बस फेऱ्या मारुन डेपोत आल्यानंतर ही घटना घडल्याने मोठा अनर्थ टळला. ठाणे ( Burning Bus In Thane ) स्थानकापासून जवळपास 50 हून अधिक प्रवशांनी या बसमधून प्रवास केला.

Burning Bus In Thane
टीएमटी बसला डेपोमध्ये आग: आगीमध्ये बस जळून खाक
author img

By

Published : Jan 9, 2023, 8:09 PM IST

ठाणे - लोकमान्य नगर येथील ठाणे परिवहनच्या डेपोमध्ये टीएमटीच्या ( TMT bus Set blaze At Thane Depot ) बसला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. सोमवारी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास वृंदावन सोसायटी ते लोकमान्य नगर डेपो असा प्रवास करून सदरची बस डेपोमध्ये आली होती. या दरम्यान ठाणे ( Burning Bus In Thane ) स्थानकापासून जवळपास 50 हून अधिक प्रवशांनी या बसमधून प्रवास केला होता. सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सदरची बस लोकमान्य नगर डेपो येथे आली. त्यानंतर काही वेळातच बसमधून धूर येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळातच बसला आग लागली.

टीएमटी बसला डेपोमध्ये आग: आगीमध्ये बस जळून खाक

बस जळत असताना आगीचे लोळ ही आग इतकी भयानक होती की ही बस जळत असताना आगीचे लोळ आणि धूर पसरण्यास सुरुवात झाली. घटनेची माहिती मिळताच टीएमटी विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ वर्तकनगर पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. त्यासह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी पिकअप वाहनासह अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान फायर वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून ताबडतोब परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. सदरची आग आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक रहिवासी, टीएमटी विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने पूर्णपणे विझवण्यात आल्याने उपस्थितांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

डिझेल टँक न फुटल्याने अनर्थ टळला परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना याबाबतची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या जवान ( Fire Brigade Thane ) घटनास्थळी दाखल होईपर्यंत आगीने रौद्र रुप धारण केले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग अटोक्यात आणली. मात्र गाडीची डिझेल टँक न फुटल्याने मोठा अनर्थ टळला.

आग लागल्यानंतर सुरू झाले स्फोट गाडी डेपोमध्ये असल्याने आसपास आग पसरण्याची भीती होती. त्यातच गाडीला आग लागल्यानंतर आगीत स्पोट होत होते. त्यामुळे गाडीच्या जवळ जवानांनी जाणे धोकादायक होते. तरीही जवानांनी जीव धोक्यात घालून आग अटोक्यात आणली. मात्र गाडीचा यात जळून कोळसा झाला आहे.

मोठा अनर्थ टळला 30 प्रवासी उतरले आणि त्यानंतर ही बस मागे पार्क करण्यात येत होती. बस पार्क केल्यानंतर बसमधून धूर निघू लागला आणि एकच मोठा गोंधळ निर्माण झाला. काही सेकंदाच्या काळातच या धुराचे रूपांतर आगीत झाले आणि आगीचे मोठे लोळ दिसू लागले. काही क्षणातच ही बस जळून पूर्णतः खाक झाली. महत्त्वाचे म्हणजे या बसचा डिझेल टँक सुरक्षित राहिल्याने मोठा अनर्थ टळला. नाहीतर या ठिकाणी मोठा ब्लास्ट झाला असता अशी माहिती परिवहन सभापती विलास जोशी यांनी दिली. आता या बसच्या आगीच्या कारणांचा शोध घेतला जाणार आहे. ही बस सहा वर्षे जुनी होती आणि दोन फेऱ्या मारून आल्यानंतर तिसऱ्या फेरीसाठी जाण्यासाठी काही वेळ विश्रांती म्हणून ती लोकमान्य नगर बस डेपोमध्ये थांबली होती. त्या दरम्यान इंजिनच्या भागातून या बसला आग लागली आणि बस फायबर बॉडी असल्याने पूर्णतः जळून खाक झाल्याचेही ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.