ETV Bharat / state

गणेश विसर्जनासाठी मनपाची नवी उपाययोजना, 52 ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्र - Artificial immersion tank

गणपती विसर्जनासाठी मीरा भाईंदर मनपा संपूर्ण शहरात ५२ स्वीकृती केंद्र उभारण्यात येणार. कोरोनाचा प्रार्दुभाव पाहता गर्दी टाळण्यासाठी मीरा भाईंदर मनपाचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती मनपा अतिरिक्त आयुक्त महेश वरूडकर यांनी दिली.

गणेश विसर्जनासाठी मनपाची नवी उपाययोजना, 52 ठिकाणी मूर्ती स्वीकृती केंद्र

author img

By

Published : Aug 19, 2020, 4:35 PM IST

मीरा भाईंदर(ठाणे)- कोरोनाच सावटाखाली सर्व उत्सव सण साधेपणाने साजरे केले जात आहेत. त्यातच महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणून गणेशोत्सव साजरा केला जातो. कोरोनामुळे गणेशोत्सव सणांवर निर्बंध लावण्यात आले आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेनी मूर्तीचे विसर्जनासाठी मनपा हद्दीतील सहा प्रभागात ५२ मूर्ती स्वीकृती केंद्र उभारण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चौपाटी, तलाव, तळ्यात मध्ये गणपती विसर्जन बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे गणेश भक्तांना त्रास होऊ नये म्हणून ५२ स्वीकृती केंद्रावर गणपती मूर्ती दिल्यानंतर मनपा कर्मचारी चौपाटीवर विसर्जन करतील. यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

गणेश भक्तांच्या मनामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गणपती विसर्जनाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. आता मीरा भाईंदर महानगरपालिकेने स्वीकृती केंद्र तयार करणार आहेत. त्यामुळे भाविकांना दिलासा मिळाला आहे. शहरातील अनेक सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधीनी कृत्रिम तलाव तयार करण्याची संकल्पना केली आहे. परंतु मनपाने अद्याप कृत्रिम तलावा तयार करण्याचा ठोस निर्णय घेतला नाही, परंतु मीरा भाईंदर मनपानी प्रत्येक प्रभागात स्वीकृती केंद्र तयार केले आहेत. त्याठिकाणी मनपा कर्मचारी उपस्थित असतील जे विसर्जनासाठी आलेल्या मूर्ती गोळा करतील आणि एकत्रित करून चौपाटीवर विसर्जन केले जाईल.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकार व मीरा भाईंदर महानगरपालिका दिलेल्या सुचेनच काटेकोर पालन करावे, असे आवाहान आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

कुठे असतील स्वीकृती केंद्र...?

प्रभाग क्रमांक १ मध्ये ३ केंद्र,तसेच प्रभाग क्रमांक २ मध्ये ६,प्रभाग क्रमांक ३ मध्ये १३ केंद्र,प्रभाग क्रमांक ४ मध्ये १६ केंद्र,प्रभाग क्रमांक ५ मध्ये ४ केंद्र,प्रभाग क्रमांक ६ मध्ये १० केंद्र उभारण्यात येणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.