ETV Bharat / state

मद्य साठा करून विक्री करणार्‍या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पनवेल शहरात मद्यसाठा करून त्याची विक्री केल्या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी, असा मिळून जवळपास 10 लाख 53 हजार रुपये किंमतीचा ऐवज पनवेल शहर पोलिसांनी हस्तगत केला आहे.

Three men charged with selling liquor
संग्रहित चित्र
author img

By

Published : Apr 17, 2020, 11:35 PM IST

नवी मुंबई - कोविड-19 कोरोना विषाणू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा सोडून इतर आस्थापनांना 3 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन करण्याची अधिसूचना काढली. असे असतानाही पनवेल शहरात मद्यसाठा करून त्याची विक्री केल्या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी, असा मिळून जवळपास 10 लाख 53 हजार रुपये किंमतीचा ऐवज पनवेल शहर पोलिसांनी हस्तगत केला आहे.

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांना खास बातमीदाराकडून पनवेल एसटी स्टॅण्ड परिसरात काही व्यक्तींकडून मद्यसाठा करून त्या मद्याची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पनवेल शहर लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे पथकाने याठिकाणी छापा टाकून बेकायदेशीररित्या मद्य साठा करून विक्रीस ठेवलेला देशी विदेशी मद्य तसेच एक गाडी जप्त केली. या प्रकरणी तिघांविरुद्ध भादवी कलम 188 सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.