ETV Bharat / state

खळबळजनक : मीरा रोड परिसरात एकाच घरात आढळले तीन मृतदेह - ira Bhayander Latest News

नया नगरच्या नरेंद्र पार्कमधील जुही इमारतीच्या बिल्डिंग नंबर 2 सी विंगमधील रूम नं. 32 मध्ये तीन जणांचे मृतदेह आढळले आहेत. यामध्ये आईसह दोन मुलांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. संशयास्पद मृत्यू असल्याने पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवले आहेत.

Three bodies found in the house in Mira Road area, thane
मीरा रोड परिसरात एकचा घरात आढळले तीन मृतदेह
author img

By

Published : Sep 7, 2021, 5:50 PM IST

मीरा भाईंदर (ठाणे) - मिरारोडच्या नया नगर परिसरात एकाच घरात तीन जणांचे मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नया नगरच्या नरेंद्र पार्कमधील जुही इमारतीच्या बिल्डिंग नंबर 2 सी विंगमधील तिसऱ्या मजल्यावरील सदनिका ३२ मध्ये ही घटना घडली आहे. मृतदेहामध्ये आई, मुलगी व मुलगा यांचा समावेश आहे. पोलिसांनी तीनही मृतदेह ताब्यात घेऊन मुंबईतील जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

शेजारी मोहम्मद अंजुम आझाद यांची प्रतिक्रिया

मुलीसह नातवंडे दिसली बेशुद्ध अवस्थेत -

मिरारोडमधील नया नगर परिसरातील नरेंद्र पार्क जुहू सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील सदनिका ३२ मध्ये तीन मृतदेह आढळून आले आहे. यामध्ये आईसह दोन मुलांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळी घरात वयोवृद्ध व्यक्तीने उठल्यावर लक्षात आले की, आपल्या मुलीसह नातवंडे बेशुद्ध पडले आहेत याची माहिती त्यांनी शेजारी व्यक्तींना दिली. स्थानिकांनी नया नगर पोलिसांना माहिती दिली असता घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले होते. संशयास्पद मृत्यू असल्याने पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनसाठी मुंबईतील जेजे रुग्णालयात पाठवली आहेत.

महिला होती आर्थिक तणावाखाली -

आत्महत्या केलेली महिला आपल्या वडिलांच्या घरी राहत होती. एक वर्षापूर्वी महिलेचा घटस्फोट झाला होता. तेव्हापासून महिला अर्थिकदृष्टया तणावाखाली होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली. मृत महिला व तिचे दोन मृत मुले मतिमंद असल्याने इमारतीच्या आवारात देखील मुलांना खेळण्यास पाठवत नव्हती. घरात झोपेच्या गोळ्या आढळून आल्या आहेत, त्यामुळे सदर महिलेने झोपेच्या गोळ्या स्वतः खाऊन मुलांना देखील देऊन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या संदर्भात पोलिसांशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर नेमका मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल.

हेही वाचा - महिलेची व्हरांड्यातच प्रसूती, बाळ दगावले; रुग्णालय कर्मचाऱ्यांनी दाखल करून न घेतल्याचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.